रोहित शेट्टीचा मल्टिस्टारर सिनेमा 'सिंघम अनेग' चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सिंघम अगेन सिनेमाच्या ट्रेलरवर प्रसिद्ध यूट्युबर ध्रुव राठी याने देखील ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. 4.58 मिनिटांच्या ट्रेलरवर नेटिझन्स देखील मिश्किल प्रतिक्रिया करताना दिसत आहेत. यूट्युबर ध्रुव राठी याने देखीस ट्रेलरबाबत असंच ट्वीट केलं आहे.
(Photos : Singham Again : मी मराठा, शिवाजी महाराजांना पूजणारा!! अजय देवगणचा रौद्रावतार)
ध्रुव राठीने काय म्हटलं?
ध्रुव ने 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरची फिरकी घेतली आहे. "सिंघम 3 सिनेमाची समरी थेट यूट्यूबवर जारी केल्याबद्दल रोहित शेट्टीचे खूप खूप आभार. आता सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची गरज नाही", असं ट्वीट ध्रुव राठीने केलं आहे.
Thanks to Rohit Shetty for releasing Singham 3 summary on Youtube directly
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) October 7, 2024
No need to go the theatre anymore!
काय आहे स्टोरी?
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे सिनेमात बाजीराव सिंघमची पत्नी अवनी हिला श्रीलंकेतील एक गुंड अपहरण करुन घेऊन जातो. त्यानंतर आपल्या सिंघम पत्नीला वाचवण्यासाठी थेट श्रीलंकेत जातो. यावेळी त्याच्या मदतीसाठी शक्ती शेट्टी (दीपिका पदुकोण), एसीपी सत्या (टाइगर श्रॉफ), सूर्यवंशी (अक्षय कुमार) आणि सिम्बा (रणवीर सिंह) येतात. या सगळ्यांच्या मदतीने सिंघम शेजारील देशात कोवर्ट ऑपरेशन करतो.
(नक्की वाचा - Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण जिंकला, पण अभिजीत सावंत मालामाल, कोणी किती पैसे कमावले? )
नेटिझन्सनेही घेतली फिरकी
एका यूजरने यूट्युबवरील ट्रेलरवर कमेंट करताना म्हटलं की, "संपूर्ण चित्रपट 5 मिनिटांत पूर्ण झाला. ज्यांनी ट्रेलर तयार केला त्यांना सलाम. फक्त 2 सीन दाखवायचे बाकी राहिले, सुरुवात आणि शेवट." दुसऱ्या एकाने म्हटलं की, "ये तो पिचर है, ट्रेलर अभी बाकी है."
एकाने लिहिलं की, "गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ब्रोकन.. शॉर्टेस्ट फिल्म एव्हर." आणखी एकाने यूजरने लिहिलं की, "350 कोटींचा सिनेमा 5 मिनिटात. रोहित शेट्टीच्या धाडसाला सलाम."
सिंघम अगेन सिनेमाचा ट्रेलर सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला आहे. सिनेमाची कथा रामायणाशी मिळती-जुळती असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटामध्ये अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह अशी तगडी स्टार कास्ट आहे. अजय देवगणच्या एका संवादामध्ये मी 'महात्मा गांधींना मानतो मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना पूजतो' असे वाक्य आहे, या सगळ्यामुळे हा ट्रेलर खासकरून मराठी रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world