रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर 2: द रिव्हेंज'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आपल्या पहिल्याच वीकेंडमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'KGF: Chapter 2' सारख्या मेगाब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे, अद्याप डब व्हर्जन प्रदर्शित न होताही या चित्रपटाने जगभरात 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 'KGF 2' ने पहिल्या वीकेंडला 264 कोटी रुपये कमावले होते, तिथे 'धुरंधर 2' ने त्याहून मोठी झेप घेतली आहे.
पहिल्या दिवसाची ऐतिहासिक आकडेवारी
चित्रपटाने 19 मार्च रोजी प्रदर्शित होताच प्रेक्षकांना थक्क केले.
भारत नेट कलेक्शन (Day 1): 96.78 ते 102.55 कोटी रुपये.
प्रिव्ह्यू + डे 1 (भारत नेट): 139.78 ते 145.55 कोटी रुपये.
भारत ग्रॉस कलेक्शन: 172.63 कोटी रुपये.
वर्ल्डवाईड ग्रॉस: 300 कोटी रुपयांहून अधिक.
'धुरंधर 2'च्या यशाची प्रमुख वैशिष्ट्ये
तांत्रिक आणि सेन्सॉर कारणांमुळे हा चित्रपट अद्याप इतर भाषांत डब होऊन प्रदर्शित झालेला नाही. तरीही केवळ मूळ भाषेतील कमाईने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. 21,728 शोज्मध्ये 50 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली. हिंदी व्हर्जनने सर्वाधिक कमाई केली असून दक्षिण भारतातही चित्रपटाला पसंती मिळत आहे. परदेशातही या चित्रपटाने 64 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.
(नक्की वाचा- Dhurandhar 2 सिनेमादरम्यान थिएटरमध्ये पाहायला मिळतेय 'या' सिनेमाची झलक! 41 दिवसांनी होणार रिलीज)
ट्रेड ॲनालिस्ट्सच्या मते, रणवीर सिंहचा जबरदस्त स्टार पॉवर, आदित्य धरचे दिग्दर्शन आणि चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्समुळे प्रेक्षक थिएटरकडे खेचले जात आहेत. पहिल्या भागाच्या तुलनेत या चित्रपटाने 138.5% जास्त ओपनिंग घेतली आहे. दिग्दर्शक आदित्य धरने म्हटलं की, "प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. ही तर फक्त सुरुवात आहे."
एकदा का चित्रपटाचे डब व्हर्जन (दाक्षिणात्य भाषांमध्ये) प्रदर्शित झाले की, या चित्रपटाची कमाई 1000 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच प्रवेश करेल, असा विश्वास चित्रपटसृष्टीतील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world