जाहिरात

Dhurandhar 2 trailer:'आता पाकिस्तानचं भविष्य हिंदुस्थान ठरवणार'; धुरंधर 2 चा ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा!

Dhurandhar 2 Trailer : आदित्य धरच्या धुरंधर या सुपरहीट चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच धुरंधर 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून त्याने सोशल मीडियावर आग लावली आहे.

Dhurandhar 2 trailer:'आता पाकिस्तानचं भविष्य हिंदुस्थान ठरवणार'; धुरंधर 2 चा ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा!
Dhurandhar 2 Trailer : रणवीर सिंहच्या धुरंधर 2 चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
मुंबई:

Dhurandhar 2 Trailer : आदित्य धरचा धुरंधर चित्रपट 2025 मध्ये आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. आता या सुपरहीट चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच धुरंधर 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून त्याने सोशल मीडियावर आग लावली आहे.

यावेळेसची कथा पहिल्या भागापेक्षाही जास्त घातक आणि अंगावर शहारे आणणारी वाटत आहे. धुरंधर: द रिव्हेंज असं नाव असलेल्या या चित्रपटात पुन्हा एकदा तोच थरार अनुभवायला मिळणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

ट्रेलरमध्ये नेमकं काय आहे?

धुरंधर 2 च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंग पुन्हा एकदा जसकीरत सिंग रंगी या धडाकेबाज भूमिकेत परतला आहे. यावेळेस तो लायरीवर कब्जा मिळवण्यासाठी धडपडताना दिसतोय आणि ट्रेलरमध्ये त्याला लायरीचा नवा बादशाह म्हणूनही प्रोजेक्ट करण्यात आलं आहे. 

पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की तो एक भारतीय गुप्तहेर म्हणून अक्षय खन्नाच्या म्हणजेच रहमान डकैतच्या टोळीत सामील होतो. आता हा सीक्वल तिथूनच पुढे जातो जिथे जसकीरत टोळीच्या आत राहून दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्याचा प्लॅन आखतो. या सगळ्यात बॅकग्राउंडला बॉम्बे रॉकर्सच्या 'अरी अरी' गाण्याचं रिमिक्स व्हर्जन ऐकायला मिळतंय जे अंगात एक वेगळीच ऊर्जा भरतं.

( नक्की वाचा : कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या )

पाकिस्तानचं भविष्य आता हिंदुस्थान ठरवणार

या ट्रेलरमधील सगळ्यात चर्चेत असलेला आणि अंगावर काटा आणणारा संवाद म्हणजे ट्रेलरचा शेवट. रणवीर सिंगचा जसकीरत हा करारी आवाजात म्हणतो की, आता पाकिस्तानचं भविष्य हिंदुस्थान ठरवणार. हा एक डायलॉग संपूर्ण सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

 एका भारतीय गुप्तहेराची ताकद आणि त्याचा देशाप्रती असलेला अभिमान या एका वाक्यातून स्पष्टपणे झळकत आहे. आदित्य धरने ज्या पद्धतीने हा सीन शूट केला आहे ते पाहता हा चित्रपट थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट मिळवणार यात शंका नाही.

( नक्की वाचा : Israel Iran War: 50 विमानांचा हल्ला आणि खामेनींचा बंकर झाला ढिगारा; इस्रायलने जारी केला मृत्यूचा Live Video )

पहिल्या भागाचा विक्रम आणि रिलीज डेट

धुरंधर हा चित्रपट गेल्या वर्षी 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता आणि संमिश्र प्रतिक्रिया मिळूनही त्याने जगभरात 1300 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. हा चित्रपट फक्त हिंदीत असूनही आणि आखाती देशांमध्ये बॅन असूनही त्याने इतकी मोठी कमाई केली होती. आता धुरंधर 2 हा येत्या 19 मार्च रोजी सिनेमागृहात धडकणार आहे. चित्रपटाची भव्यता आणि ट्रेलरमधील ॲक्शन पाहता हा भाग पहिल्या भागाचे सर्व रेकॉर्ड मोडेल अशी चिन्हं दिसत आहेत.

इथे पाहा VIDEO
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com