जाहिरात

Sangli News: पलाश मुच्छलविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; स्मृती मानधनाच्या बालमित्राने दिलेली तक्रार

FIR Against Palash Muchhal : प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल याच्या विरोधात सांगलीत फसवणूक आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli News: पलाश मुच्छलविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; स्मृती मानधनाच्या बालमित्राने दिलेली तक्रार

शरद सातपुते, सांगली

संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. फसवणूक आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

सांगलीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने यांनी ही तक्रार दाखल केली आहे. विज्ञान माने हे भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिचे बालमित्र आहेत. माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पलाश मुच्छलने त्यांच्या “नजरिया” या चित्रपटासाठी गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते. या गुंतवणुकीच्या नावाखाली पलाशने त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले, मात्र त्यानंतर ते पैसे परत केले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

फसवणूक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा

विज्ञान माने यांनी केवळ आर्थिक फसवणुकीचाच नव्हे, तर जातीवाचक शिवीगाळ आणि छळ केल्याचा आरोपही पलाशवर केला आहे. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी पलाश मुच्छलच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

(नक्की वाचा-  Dombivli News: खाऊ आणायला गेलेली आई आलीच नाही; 3 चिमुरड्यांचे रस्त्यावरच रडून-रडून हाल!)

पोलिसांकडून तपास सुरु

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सांगलीचे पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत यांनी माहिती दिली की, तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील पुराव्यांच्या आधारे कारवाई केली जाईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com