जाहिरात

Hera Pheri 3: प्रतीक्षा संपली! 'हेरा फेरी 3' बाबत मोठी बातमी अखेर आली

सुनील शेट्टीने यावेळी चित्रपटाच्या शूटिंगबद्दल अनेक अपडेट्स दिल्या आहेत.

Hera Pheri 3: प्रतीक्षा संपली! 'हेरा फेरी 3' बाबत मोठी बातमी अखेर आली
मुंबई:

'हेरा फेरी' हा बॉलिवूडमधील एक आयकॉनिक कॉमेडी चित्रपट आहे. यात सुनील शेट्टी, परेश रावल आणि अक्षय कुमारच्या त्रिकुटाने कॉमेडीचा तडका लावला होता. या चित्रपटाचा सिक्वल असलेला फिर हेरा फेरी ही प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. त्यानंतर सुनील शेट्टीने एक मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. 'हेरा फेरी 3' चा टीझर कोणत्या दिवशी रिलीज होणार आहे याचीच माहिती सुनिल शेट्टीने दिली आहे.  चित्रपटाचा टीझर यापूर्वीच शूट झाला असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल ही त्याने माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

    सुनील शेट्टीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, आम्ही 'हेरा फेरी 3' साठी शूटिंग सुरू केली आहे. त्याचा टीझरही शूट झाला आहे. आशा आहे की 'हेरा फेरी 3' चा टीझर आयपीएल दरम्यान रिलीज होईल. अंतिम सामन्यापूर्वी 'हेरा फेरी 3' चा टीझर प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असं तो म्हणाला. मी खूप उत्सुक आहे, कारण आमची तीच जुनी टीम एकत्र आली आहे. हा चित्रपट नेहमीच खास राहिला आहे." असं ही तो म्हणाला.  विशेष म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहेत. त्यांनीच चित्रपटाचा पहिला भागही दिग्दर्शित केला होता.

    ट्रेंडिंग बातमी - भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर

    सुनील शेट्टीने यावेळी चित्रपटाच्या शूटिंगबद्दल अनेक अपडेट्स दिल्या आहेत. ते म्हणाले, "आम्ही तिघेही जेव्हा एकत्र येतो, तेव्हा सेटवर आनंदाचे वातावरण असते. खरं सांगायचं तर, तिथे वॉर्निंग बोर्ड लावायला पाहिजे. कारण आम्ही मिळून संपूर्ण सेटचे वातावरण बदलून टाकतो. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शनही म्हणतात, 'तुम्हाला मजा करायची असेल, तर शॉट झाल्यावर करा'. 'हेरा फेरी 3' ची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'हेरा फेरी' चित्रपट 2000 मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर त्याचा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला होता.

    ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

    हेराफेरी हा चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला त्यावेळी अनेकांना तो अँक्शनपट असेल असं वाटलं होतं. त्याला कारण चित्रपटात सुनिल शेट्टी आणि अक्षय कुमार हे होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र सर्वांचाच अंदाज चुकला. हा एक कॉमेडी चित्रपट होता. चित्रपटात अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांनी सहज सुंदर कॉमेडी केली होती. सोबत ओम पुरी यांनी केलेला रोल ही कुणी विसरु शकले नाहीत. त्यामुळे एका भन्नाट विनोदीपटाचा आनंद चाहत्यांना घेता आला. याचा दुसरा भागही त्यामुळेच प्रेक्षकांच्या पसंतीला पडला होता. आता तिसऱ्या भागाची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

    Listen to the latest songs, only on JioSaavn.com