जाहिरात

Housefull 5 Trailer: 18 कलाकारांसह अक्षय कुमार पुन्हा हसवण्यासाठी सज्ज! पाहा हाउसफुल 5 चा धमाकेदार ट्रेलर

'हाउसफुल 5' च्या ट्रेलरची सुरुवात नाना पाटेकर यांच्या आवाजाने होते.

Housefull 5 Trailer: 18 कलाकारांसह अक्षय कुमार पुन्हा हसवण्यासाठी सज्ज! पाहा हाउसफुल 5 चा धमाकेदार ट्रेलर

बहुप्रतीक्षित 'हाउसफुल 5' चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. हा एक धम्माल कॉमेडी चित्रपट आहे. यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंह, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रणजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर यांसारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सर्व कलाकारांचे चाहते 'हाउसफुल 5' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'हाउसफुल' फ्रँचायझीच्या इतर चित्रपटांप्रमाणे यातही कॉमेडी आणि ॲक्शनचा भरपूर मसाला पाहायला मिळणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'हाउसफुल 5' च्या ट्रेलरमधील झलक
'हाउसफुल 5' च्या ट्रेलरची सुरुवात नाना पाटेकर यांच्या आवाजाने होते. जिथे ते एका मालमत्तेबद्दल बोलताना दिसतात. त्यानंतर ट्रेलरमध्ये हळूहळू सर्व कलाकारांची एंट्री होते. ट्रेलर पाहून असे म्हणता येईल की, इतर 'हाउसफुल' चित्रपटांप्रमाणेच अक्षय कुमारची कॉमेडी प्रेक्षकांना खूप हसवेल. तसेच, इतर कलाकारही 'हाउसफुल 5' च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी करताना दिसत आहेत. चित्रपटाची संपूर्ण कथा एका जहाजावर घडताना ट्रेलरमधून स्पष्ट होते.

कॉमेडी आणि ॲक्शनचा तडका
'हाउसफुल 5' मध्ये कॉमेडीसोबतच ॲक्शनचाही अनुभव प्रेक्षकांना घेता येईल. या फ्रँचायझीमध्ये सोनम बाजवा, डिनो मोरिया, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंह आणि फरदीन खान यांसारख्या नवीन कलाकारांनी एंट्री घेतल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पुढील महिन्यात 6 तारखेला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'हाउसफुल 5' चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com