- महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर खरंच लग्न ठरलंय?
- प्रियदर्शिनी इंदलकरचा होणारा नवरा कोण आहे?
- प्रियदर्शिनी इंदलकरचं लग्न कधी आहे?
Priyadarshini Indalkar Marriage: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमाद्वारे घरघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar News) कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. प्रेक्षकांच्या मनामध्ये तिने आपलं खास स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तिने विविध पात्र साकारत विनोदी शैलीने प्रेक्षकांना प्रचंड हसवलंय. प्रियदर्शिनीने काही सिनेमांसह वेबसीरिजमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सोयरीक (2022), फुलराणी (2023) आणि नामदेव बीएससी अॅग्री (2024) या सिनेमांमध्येही जबरदस्त अभिनय केलाय. विशेषतः फुलराणी सिनेमातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
(नक्की वाचा: Priyadarshini Indalkar Photos: मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटोवर चाहत्यांकडून हार्ट इमोजीचा पाऊस)
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचे लग्न ठरलं?
दरम्यान प्रियदर्शिनी इंदलकर सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. नवऱ्यामुलीच्या वेशातील प्रियदर्शिनीचा फोटो समोर आलाय. प्रियदर्शिनीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसलीय त्यावर तिने हिरव्या रंगाचा ब्लाउज मॅच केलाय. हातावर मेंदी, कपाळावर मुंडावळ्या, आकर्षक दागिने अशा सुंदर पेहरावातील प्रियदर्शिनीचा फोटो व्हायरल झालाय. पण खरंच प्रियदर्शिनी इंदलकरचं लग्न ठरलंय का? लग्न ठरलं असेल तर तिचा होणार नवरा कोण आहे? होणाऱ्या नवऱ्याचे नाव काय आहे, तो नेमकं काय करतो, लग्न कधी आणि कुठे होणार? की एखाद्या आगामी सिनेमातील तिचा हा लुक आहे? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना जाणून घ्यायची आहेत. दरम्यान या फोटोबाबत प्रियदर्शिनी इंदलकरकडूनही अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीय, त्यामुळे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
(नक्की वाचा: Priyadarshini Indalkar Dashavatar Saree: प्रियदर्शिनी इंदलकरचा दशावतार स्पेशल साडी लुक पाहिला का? फोटो पाहून प्रेमात पडाल)
प्रियदर्शिनी इंदलकरचा ग्लॅमरस लुक
प्रियदर्शिनी इंदलकरचा सुंदर लुक
Priyadarshini Indalkar | प्रियदर्शिनी इंदलकरचे ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांना आवडतंय
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world