
Kokan Hearted Girl Gruhpravesh Video: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगतचा 16 फेब्रुवारी रोजी धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. मेंदी, कोकटेल पार्टीपासून ते लग्नसोहळ्यापर्यंत या दोघांनी प्रत्येक कार्यक्रम अगदी भव्यदिव्य पद्धतीने आयोजित केला होता. अंकिता-कुणालच्या लग्नसोहळ्यामध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी झाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंकिता-कुणालने लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे फोटो - व्हिडीओ चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले. सासरी अंकिताचा कशा पद्धतीने गृहप्रवेश झाला, याचाही व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अंकिता आणि कुणाल हातातील हळकुंड दाखवत आहेत. अंकिताच्या गृहप्रवेशासाठी सासरच्या मंडळींनी अगदी जय्यत तयारी केली होती. मुख्य प्रवेशद्वारापासून घरापर्यंत जाण्यासाठी सासरकडच्या मंडळींनी अंकितासाठी फुलांनी सुंदर पद्धतीने पायवाट सजवली होती. अंकिताचे औक्षण करण्यात आले.
(नक्की वाचा: Kokan Hearted Girl Mother In Law: कोकण हार्टेड गर्लची सासूबाई पाहिल्या का?)
यानंतर अंकिता आणि कुणालने उखाणा घेऊन माणगावच्या घरात गृहप्रवेश केला. "सागरकिनारी जुळल्या गाठी, कुणालचं नाव घेते साताजन्मासाठी" असा उखाणा अंकिताने घेतला तर "सरीवर सरी पावसाच्या सरी, अंकिताच माझी कोकणपरी" असा उखाणा कुणालनं अंकितासाठी घेतला. उखाण्यानंतर माप ओलांडून अंकिताने कुणालच्या घरामध्ये प्रवेश केला. नव्या नवरीला भेटण्यासाठी कुणालच्या घरी गर्दी झाली होती. अंकिता आणि कुणालने बच्चेकंपनीसोबत फोटो देखील काढले.
(नक्की वाचा: वालावलकरांचो थोरलो जावई! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचा विवाहसोहळा संपन्न)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world