जाहिरात

Ankita PrabhuWalawalkar: बापरे! कोकण हार्टेड गर्लच्या नवऱ्याने तिच्यावर हात उचलला, तिचं मोठं स्वप्न मोडलं, का?

Ankita PrabhuWalawalkar: कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि तिचा पती कुणाल भगतमध्ये नेमके काय घडलं?

Ankita PrabhuWalawalkar: बापरे! कोकण हार्टेड गर्लच्या नवऱ्याने तिच्यावर हात उचलला, तिचं मोठं स्वप्न मोडलं, का?
"Ankita PrabhuWalawalkar: अंकिता प्रभू वालावलकरवर नवऱ्याने उचलला हात?"

Ankita PrabhuWalawalkar| Bigg Boss 19: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभू-वालावलकरने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओची चर्चा होतेय. काही महिन्यांपूर्वीच अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगतचे लग्न झालंय. दोघांचा संसार सुरू होऊन जवळपास सात ते आठ महिनेच झाले असतील तोच कुणालने अंकितावर चक्क हात उगारला. कुणालने पत्नीच्या कानाखाली खाडकन वाजवली आणि याविरोधात आवाज उठवण्याऐवजी नेटकरी चक्क हसतायेत. हो तुम्ही वाचलंय ते खरंय! दोघांमध्ये नेमकं काय घडलंय, जाणून घेऊया...

अंकिता आणि कुणालमध्ये नेमके काय घडलं? | Ankita PrabhuWalawalkar Bigg Boss 19 Reel

अंकिता प्रभू-वालावलकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा पती कुणाल भगत तिच्या कानाखाली वाजवत असल्याचं दिसतंय. पण मंडळींनो, कुणालने अंकिताला खरंखुरं मारलेले नाही. त्यामुळे चिंता करू नका. सध्या हिंदी बिग बॉस 19 हा रिअ‍ॅलिटी शो सुरू आहे आणि प्रेक्षकांचा यास चांगला प्रतिसाद मिळतोय. याच पार्श्वभूमीवर अंकिताने एक रील शेअर केलंय. 

(नक्की वाचा: Kokan Hearted Girl Gruhpravesh Video: कोकण हार्टेड गर्लचा सासरी दणक्यात झाला गृहप्रवेश, दोघांनी घेतला हटके उखाणा)

अंकिता वालावलकर Bigg Boss 19मध्ये सहभागी होणार आहे का? तिने नेमके काय म्हटलंय?

नमस्कार, 
जसं की तुम्हाला माहितीये की बिग बॉस हिंदीच्या घरात आज माझी वाइल्ड कार्ड एण्ट्री होतेय आणि मी खूप एक्ससायटेड आहे, या जर्नीसाठी. बिग बॉस मराठीच्या वेळेस खरं तर मीच बिग बॉस बघितला नव्हता. पण आता माझ्या गाठीशी अनुभव सुद्धा आहे, त्यामुळेच या प्रवासासाठी मी खूप एक्ससायटेड आहे. बिग बॉसच्या मराठीच्या घरात असताना तुम्ही मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले. तसेच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. तुमचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला टॉप 5मध्ये .... आणि तेवढ्यात कुणाल तिला चापट मारुन स्वप्नातून जागं करतो. तर अंकिताने गंमतीशीर रील सोशल मीडियावर शेअर केलं होतं. दोघांमध्ये भांडणं वगैरे काहीही झालेले नाही.

व्हिडीओ पाहताना सुरुवातीला प्रेक्षकांनाही असंच वाटलं की अंकिता बिग बॉस हिंदीमध्ये खरंच स्पर्धक म्हणून सहभागी होतेय. पण हा केवळ एक कॉमेडी व्हिडीओ होता. 

Who Is Shantanu Naidu's Girlfriend: शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे खास फोटो पाहून चाहत्या म्हणाल्या:Heart Broken

(नक्की वाचा: Who Is Shantanu Naidu's Girlfriend: शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे खास फोटो पाहून चाहत्या म्हणाल्या:Heart Broken)

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अंकिता प्रभू-वालावलकर स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. अंकिताचा बिग बॉसमधील सुरुवातीचा खेळ कच्चा होता, पण तिला गेम समजल्यानंतर खेळात रंगत आली आणि ती थेट टॉप 5पर्यंतही पोहोचली होती.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com