![Ankita Walawalkar Car Accident : अंकिता वालावलकरच्या कारचा अपघात, VIDEO आला समोर Ankita Walawalkar Car Accident : अंकिता वालावलकरच्या कारचा अपघात, VIDEO आला समोर](https://c.ndtvimg.com/2025-02/o9otgit8_ankita-walawalkar_625x300_15_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
Ankita Walawalkar Car Accident : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग मराठीच्या पाचव्या सीजनची स्पर्धक अंकिता वालावलकर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या 16 फेब्रुवारी रोजी तिची विवाह सोहळा पार पडणार आहे. त्याआधी लग्नाच्या धामधुमीदरम्यान अंकिताच्या कारला एक छोटासा अपघात झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंकिताने काही दिवसांपासून एक लक्झरी कार खरेदी केली आहे. याच कारने प्रवास करत असताना तिचा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. कारचं मात्र किरकोळ नुकसान झालं आहे.
(नक्की वाचा- कोकणची परी...! कविता-शायरी नव्हे तर कोकण हार्टेड गर्लच्या घोवाने थेट तयार केले गाणं )
![Konkan Hearted Girl Ankita walawalkar Konkan Hearted Girl Ankita walawalkar](https://c.ndtvimg.com/2025-02/8ba5svm8_konkan-hearted-girl-ankita-walawalkar_625x300_15_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=1200,height=738)
अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र अपघातानंतर गाडीच्या नुकसानीचा व्हिडीओ समोर आला आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की, कारच्या चालकाच्या बाजूच्या आरशाचं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही सुरक्षित असल्याचंही अंकिताने तिच्या स्टोरीमध्ये सांगितलं आहे.
(नक्की वाचा: Kokan Hearted Girl Mehendi Photos: 'आयुष्याची पहिली पायरी...' कोकण हार्टेड गर्लचा मेंदी सोहळा)
अंकिता प्रभू वालावलकर लवकरच संगीतकार कुणाल भगतसोबत येत्या 16 फेब्रुवारीला लग्नबेडीत अडकणार आहे. ग्रामदेवतेसमोर लग्नाची पत्रिका ठेवल्याच्या क्षणापासून अंकिता आणि कुणाल त्यांच्या लग्नसोहळ्याबाबतचे प्रत्येक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. लग्नाचे शॉपिंग, चाहत्यांकडून मिळालेल्या गिफ्ट्सपासून ते स्वतःचे सामान नवऱ्याच्या घरी शिफ्ट करेपर्यंतच्या सर्व गोष्टी अंकिता-कुणाल आपल्या फॉलोअर्ससह शेअर करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world