प्रसिद्ध कवी कुमार विश्वास अनेकदा त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या क्षेत्रातील व्यक्तींवरील त्यांच्या वक्तव्यावर चर्चा होते. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हा आणि तिचा नवरा झहीर इक्बालवरील त्यांचं वक्तव्य चर्चेत होतं. आता सैफ अली खान आणि करीना कपूरवरील त्यांचं वक्तव्य चर्चेत आहे. कुमार विश्वासनं करीना आणि सैफनं त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका कार्यक्रमात कुमार विश्वास यांनी कुणाचंही नाव न घेता करीना कपूर आणि सैफ अली खान यांना लक्ष्य केलं. कुमार म्हणाले, 'मला माहिती आहे की लोकं इथं माझं वक्तव्य रेकॉर्ड करायला बसली आहेत. पण, मायानगरीत राहणाऱ्यांना देशाला काय हवंय हे समजलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.'
( नक्की वाचा : नीतू कपूरनं केलं आलिया भटकडे दुर्लक्ष, 'ती' आई म्हणून हाक मारत होती पण..Video Viral )
करीना आणि सैफवर टीका
ते पुढे म्हणाले की, 'आता हे चालणार नाही. आमच्या जीवावर लोकप्रिय होणार. आम्ही तिकीटं खरेदी करणार. हिरो आम्ही करणार. हिरोईन आम्ही करणार आणि तुमच्या तिसऱ्या लग्नानंतर जे मुल होईल त्याला तुम्ही बाहेरुन आलेल्या आक्रमकाचं नाव देणार. हे चालणार नाही. किती नावं आहेत यार, काहीपण ठेवलं असतं. रिझवान ठेवता, उस्मान ठेवता. युनूस ठेवता, हुजूरच्या नावावर कोणतंही नाव ठेवता, पण तुम्हाला एकच नाव मिळालं?'
क्या कुमार विश्वास की ये टिप्पणी अब सैफ अली खान और करीना कपूर के लिए है?#KumarVishwas pic.twitter.com/TaMi2dybY7
— Avdhesh Kumar (@ImAvdheshkumar) January 1, 2025
खलनायकही होऊ देणार नाही...
कुमार विश्वास इथंच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, 'ज्या लंगड्या माणसानं आपल्या देशात येऊन येथील आई-बहिणींवर बलात्कार केले तो लफंगाच तुम्हाला या गोड बाळाचं नाव ठेवताना आठवला का? तुम्ही त्याला हिरो बनवणार असाल तर आम्ही त्याला खलनायक देखील होऊ देणार नाहीत, लक्षात ठेवा.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world