
Nitish Bharadwaj News: छोट्या पडद्यावरील महाभारत मालिकेमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते तुम्हाला आठवतच असतील. श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे अभिनेते नितीश भारद्वाज घराघरांत पोहोचले होते. पण नितीश सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. पत्नी स्मिता गेटपासून विभक्त होण्यासाठी ते कायदेशीर लढाईमध्ये अडकले आहेत. दोघांनीही घटस्फोटासाठी कोर्टामध्ये अर्ज केला आहे. नितीश यांच्या पत्नीने भोपाळमधील कोर्टामध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. तक्रारीमध्ये स्मिता यांनी अभिनेत्यावर मानसिक छळाचा आरोप केलाय. अलिकडेच नितीश यांनी कौटुंबिक वादावर विधान केलं आणि यामुळे त्यांचे मुलांसोबतचे नाते ताणलं गेल्याचंही त्यांनी म्हटलंय.
नितीश भारद्वाज यांनी मुलांबाबत काय सांगितलं?
'टाइम्स नाऊ' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नितीशने सांगितलं की, पत्नीसोबत झालेल्या वादामुळे मुलं दुरावली गेली आहेत. नितीश यांनी स्मिता यांचे दावे फेटाळून लावत ते खोटे असल्याचंही म्हटलंय. संसाराच्या प्रत्येक टप्प्यावर पत्नी अनेकदा खोटं बोलल्याचंही त्यांचं म्हणणंय. मुलांबाबत बोलताना नितीश यांनी त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली.
नितीश यांनी म्हटलं की, तुम्हाला वडील म्हणून घ्यायला लाज वाटते, असे माझी मुलं मला म्हणतात. यानंतर पाच मिनिटांनी ती उठली आणि मला दरवाजा दाखवला.
(नक्की वाचा: Sarang Sathaye Marriage: 'लग्न आमच्यासाठी प्राधान्याची गोष्ट नव्हती, पण...' सारंग साठे-पॉलाने केले लग्न Photos)
मुलांच्या कस्टडीसाठी मी लढतोय: नितीश भारद्वाज
नितीश यांनी पुढे असंही म्हटलं की, स्मिताच्या मागण्या मान्य केल्या म्हणजे मुलांच्या कस्टडीसह पोटगी दिली तर पत्नी घटस्फोटाच्या अर्जावर स्वाक्षरी करेल. मी माझ्या मुलांसाठी लढतोय. माझ्या मुलांना स्मितासारखे व्हावं, ही माझी इच्छा नाही.
(नक्की वाचा: Nilesh Sable And Bhau Kadam: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर निलेश साबळे आणि भाऊ कदम घेऊन येणार काहीतरी भन्नाट, कुठे आणि केव्हा?)
नितीश भारद्वाज पत्नीपासून विभक्त कधी झाले?
स्मिता आणि नितीश यांनी वर्ष 2009मध्ये लग्न केले होते. वर्ष 2019मध्ये दोघंही विभक्त झाले होते. तेव्हापासून दोघांमधील घटस्फोटाचा निर्णय प्रलंबित आहे. सध्या नितीश आणि स्मिता मुलांच्या कस्टडीसाठी लढत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world