जाहिरात

दारू पिऊन मॉडेल झिंगली,भलत्याच पार्टीत घुसली; अभिनेत्याच्या घरचे म्हणाले 'सून असावी तर अशी'

Bollywood Love Story: पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर, 1997 साली ही मॉडेल आणि अभिनेता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दारू पिऊन मॉडेल झिंगली,भलत्याच पार्टीत घुसली; अभिनेत्याच्या घरचे म्हणाले 'सून असावी तर अशी'
Bollywood Love Story: झिंगलेली मॉडेल अभिनेत्याच्या घरच्यांना फारच आवडली होती
मुंबई:

काही बॉलिवूड सेलिब्रिटी असे असतात ज्यांच्या प्रेमप्रकरणांच्या आणि लग्नाच्या कहाण्या या भलत्याच सुरूस असतात. 90 च्या दशक एका अभिनेत्याने चांगलेच गाजवले होते. या अभिनेत्याच्या वाट्याला कमी चित्रपट आले मात्र त्यात त्याचे आपली खास छाप सोडली होती. धक धक गर्ल माधुरी दिक्षितसोबतचा त्याचा रोमँटीक चित्रपटही बऱ्यापैकी चालला होता. बड्या अभिनेत्याचा भाऊ म्हणून ओळख पुसून टाकत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या अभिनेत्याचे एका मॉडेलसोबत सूत जुळले होते. ही मॉडेल दारू पिऊन पार झिंगलेली असताना तिची आणि या अभिनेत्याची नजरानजर झाली, आणि तिथेच या दोघांच्या साता जन्माच्या गाठी जुळल्या. 

(नक्की वाचा: संजय कपूरला शेवटचा निरोप देताना करिश्मा झाली भावुक)

संजय आणि महीप प्रेमात कसे पडले ?

‘फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्ह्ज' या शोमध्ये महीप कपूर झळकली होती. या शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या महीप कपूरने तिचं आणि तिचा नवरा संजय कपूर यांचं प्रेमप्रकरण (Maheep And Sanjay Kapoor Love Story) कसं जुळलं त्याबद्दल माहिती दिली. या दोघांच्या लग्नाला आता 25 वर्षांहून अधिकचा काळ गेला असून या दोघांना दोन मुले आहेत. त्यापैकी शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  महीप आणि संजय कपूर यांच्या नात्याची सुरूवात ही जगावेगळी होती. 

(नक्की वाचा: दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य 30 वर्षांनंतर उघड, सहकलाकारानं सोडलं मौन)

दारू पिऊन झिंगलेली महीप सगळ्यांना आवडली

महीप कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, संजय कपूरसोबतची तिची पहिली भेट (How did Maheep Kapoor and Sanjay Kapoor meet?) ही जगावेगळी आणि भन्नाट होती. मॉडेल म्हणून लौकीक मिळवलेल्या महीपने एकेदिवशी भरपूर दारू प्यायली होती. पार झिंगेपर्यंत दारू प्यायल्यानंतर ती एका पार्टीत घुसली होती. या पार्टीचं आपल्याला निमंत्रण नव्हतं तरीही मी त्या पार्टीत घुसल्याचे महीपने सांगितलं होतं. तिथेच तिची आणि संजय कपूर यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या पार्टीमध्ये तिची अनिल कपूर, त्याची पत्नी सुनीता कपूर, बोनी कपूर याची पत्नी श्रीदेवी या सगळ्यांशी भेट झाली. झिंगलेल्या अवस्थेतील बोल्ड आणि बिनधास्त महीपला पाहून हे सगळेजम म्हणाले होते 'सून असावी तर अशी' 

(नक्की वाचा:हॉट अभिनेत्रीसोबतचा संसार मोडला, मेकअप आर्टिस्टवर प्रेम जडले; हा खान आता पुन्हा बनणार बाप)

एकच रात्र मजा करायची ठरवली, आयुष्यभरासाठी जोडीदार बनले (Did Maheep Kapoor have a one-night stand with Sanjay Kapoor?)

महीपने सांगितलं की संजयशी ओळख झाल्यानंतर या दोघांनी  एक रात्र 'मजा' करायची ठरवली होती.  ‘वन नाईट स्टँड'पासून सुरू झालेली दोघांची कहाणी लग्नापर्यंत कशी पोहोचली हे त्यांनाही कळाले नाही.  महीपने सांगितले की “आम्ही कुलाब्यातील ताज हॉटेलमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करत होतो, यावेळी दारूच्या नशेत असलेल्या संजयने मला म्हटले की, ‘बघ, आपण लग्न करतोय.' मी पण टकीलाचे शॉट्स घेत ‘ठीक आहे, ठीक आहे' असे म्हटले. बस्स, इथेच आमचे लग्न जमले.” त्यानंतर पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर, 1997 मध्ये महीप कपूर आणि संजय कपूर विवाहबंधनात अडकले. या दोघांना शनाया कपूर आणि जहान कपूर ही दोन मुले आहेत.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com