
Pranit More Comeback Video : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने मारहाणीच्या प्रकरणानंतर दमदार कमबॅक केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कमबॅक हे टायटल असलेला व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये प्रणित मोरे म्हणतोय की,"त्या कांडनंतर (मारहाणीच्या प्रकरणानंतर) पहिला शो मी गोव्यातच करतोय. गोव्यातील लोक प्रचंड प्रेमळ आहेत तर बऱ्याच लोकांचे मला मेसेज आले. एक तर कार्यक्रमाचे तिकीट खूपच लवकरच विकले गेले होते तर बऱ्याच लोकांना तिकीटही मिळाले नाहीत. ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांचेही मेसेज आले की भाऊ तू ठीक आहेस का? तू शारीरिक-मानसिकरित्या ठीक आहेस का? तू कार्यक्रम करू शकणार आहेस का? कारण त्या प्रकरणाला जास्त वेळ झालेला नाही. पण माझे म्हणणं असे होते की माझी जी काही परिस्थिती असेल तरीही मी हा कार्यक्रम करणार. कारण चाहत्यांसोबत ती माझी कमिटमेंट आहे आणि माझे हे पाऊल स्वाभाविक आहे, कारण मी वीर नाहीय वीर मराठा आहे." प्रणितच्या शेवटच्या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याला दाद दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा: Veer Paharia : कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात 12 जणांवर गुन्हा, वीर पहारियाबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा राग)
नेमके काय झाले होते?
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला 2 फेब्रुवारी 2025 रोजी सोलापुरात मारहाण करण्यात आली होती. सोलापुरातील एका हॉटेलमध्ये प्रणितचा कार्यक्रम पार पडल्यानंतर 12 लोक त्याच्याकडे फोटो काढण्याच्या निमित्ताने गेले आणि त्याला मारहाण केली. प्रणितने कार्यक्रमादरम्यान अभिनेता वीर पहारियाबाबत चुकीचे विधान केले होते, असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे होते. या कारणावरुनच त्याला मारहाण केल्याचे म्हटले जात होते.
(नक्की वाचा: Praneet More : वीर पहारियाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण)
अभिनेता वीर पहारियाने व्यक्त केली दिलगिरी
दरम्यान प्रणितला मारहाण झाल्याचे कळताच वीर पहारियाने सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देत म्हटलं की, प्रणितसोबत जे घडले त्याबाबत मला काहीच कल्पना नाही. त्याला झालेली मारहाण नक्कीच निंदनीय आहे. मी त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. त्याचा पाठपुरावाही मी करणार आहे, असे म्हणत वीरने दिलगिरी व्यक्त केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world