
Manika Vishwakarma Crowned Miss Universe India 2025: राजस्थानच्या जयपूरमध्ये मिस युनिवर्स इंडिया 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे सर्वाना मागे टाकत मनिका विश्वकर्माने (Manika Vishwakarma) मिस युनिवर्सचा क्राऊन डोक्यावर चढवला. मनिका राजस्थानच्या गंगानगरची राहणारी आहे आणि दिल्लीत मॉडेलिंग करते. विशेष म्हणजे 2024 मध्ये ती मिस युनिवर्स राजस्थान जिंकली होती. आता मिस युनिवर्स इंडिया 2025 (Miss Universe India 2025) जिंकल्यानंतर 74 व्या मिस युनिवर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसेल. मनिकाने अंतिम फेरीत असं उत्तर दिलं की सर्व परीक्षक प्रभावित झाले. मनिकाला शेवटच्या फेरीत कोणता प्रश्न विचारण्यात आला होता आणि तिने काय उत्तर दिलं.
थ्रेडिंग के चक्कर में काटने पड़ सकते हैं अस्पताल के चक्कर, ब्यूटी पार्लर जाती हैं तो कभी ना करें यह गलती

Photo Credit: Instagram
मनिका विश्वकर्माला विचारण्यात आला हा प्रश्न
अंतिम फेरीत मनिकाला विचारलं, जर तुम्हाला महिला शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देणे यापैकी एक निवडायचे असेल तर तुम्ही काय निवडाल? या प्रश्नाचे उत्तर देताना मनिका म्हणाली - महिलांना बऱ्याच काळापासून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. परिणामी आपल्या लोकसंख्येचा अर्धा भाग शिक्षणापासून दूर आहे. इतकी कुटुंबे गरीब आहेत. म्हणून, जर मला संधी मिळाली तर मी महिला शिक्षणाला प्राधान्य देईन. यामुळे केवळ एका व्यक्तीचं जीवन बदलणार नाही तर या देशाचे आणि जगाचे भविष्य प्रत्येक स्तरावर बदलेल. जरी दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, परंतु असं काही पाऊल उचलायला हवं जे दीर्घकाळात उपयुक्त ठरू शकेल.

Photo Credit: Instagram
शिक्षण काय? (This is Qualification)
मनिका राजस्थानच्या श्रीगंगानगरची राहणारी आहे. सध्या ती दिल्लीत राहते. ती राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world