
Prajakta Gaikwad Instagram Post: स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता गायकवाडने अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या घरी लवकरच लग्नाचा बार उडणार असल्याचे दिसत आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे लग्न ठरले असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा, ठरलं! असा खास कॅप्शन देत प्राजक्ताने तिचे लग्न ठरल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने तिचे खास फोटोही शेअर केले आहेत.
या फोटोंंमध्ये प्राजक्ताने सुंदर साडी, दागिन्यांसह गळ्यात हारही घातला आहे. तिच्यासोबत घरातील मंडळी आणि नातेवाईकही या फोटोंमध्ये दिसत आहेत. त्यामुळे प्राजक्ताचा साखरपुडा झाला असून त्याच सोहळ्यातील हे फोटो आहेत अशी चर्चा आता रंगली आहे. मात्र प्राजक्ताचा होणारा पती कोण? तो काय करतो? याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे.
प्राजक्ता गायकवाडने हे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांसह सिने सृष्टीतील अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. फोटोवर कोकण हार्टेड गर्लसह, मेघा धाडे, कार्तिकी गायकवाड, मोनालिसा बागल या कलाकारांनाही कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमधील प्राजक्ताचा सोज्वळ साज पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडलेत.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात एन्ट्री केली. या मालिकेतील तिची येसूबाईंची भूमिका प्रचंड गाजली. अमोल कोल्हे यांच्यासोबत तिने साकारलेल्या या भूमिकेला लोकांनी अशरक्ष: डोक्यावर घेतले. यानंतर तिने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world