जाहिरात

Dharmendra News:आपणा सर्वांचे लाडके धरम...धर्मेंद्र यांच्या निधनाच्या 14 दिवसांनंतर बॉबीने शेअर केली खास पोस्ट

Bobby Deol Emotional Post For Dharmendra: धर्मेंद्र यांच्या 90व्या वाढदिवशी बॉबी देओलनं खास पोस्ट शेअर केलीय. बॉबची पोस्ट वाचून चाहतेही भावुक झाले आहेत.

Dharmendra News:आपणा सर्वांचे लाडके धरम...धर्मेंद्र यांच्या निधनाच्या 14 दिवसांनंतर बॉबीने शेअर केली खास पोस्ट
"Bobby Deol Emotional Post For Dharmendra: बॉबी देओलची धर्मेंद्र यांच्यासाठी खास पोस्ट"
Bobby Deol Instagram

Bobby Deol Emotional Post For Dharmendra: अभिनेता बॉबी देओलने दिवगंत अभिनेते आणि वडील धर्मेंद्र यांच्या जन्मदिनी त्यांच्याप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचं निधन झाल्यानंतर सनी देओल किंवा बॉबी देओलने सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं टाळलं होतं. पण धर्मेंद्र यांच्या जन्मदिनी आपल्या वडिलांप्रति या दोघांनीही आदर आणि प्रेम व्यक्त केलंय. वडिलांच्या आठवणीत दोघंही भावुक झाले आहेत. बॉबी देओलने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत मोठं कॅप्शन लिहिलंय.  

आपणा सर्वाचे लाडके धरम…: बॉबी देओल

बॉबीने पोस्टमध्ये लिहिलंय की, "माझे बाबा आणि आपणा सर्वाचे लाडके धरम.. जगामध्ये इतकं प्रेम नाही, जेवढं तुम्ही आम्हा सर्वांना दिलंय. प्रत्येक आसू आणि हसूमध्येही तुम्ही साथ निभावली. प्रत्येक अडचणीत मदतीचा हात दिला, त्याच प्रकारे ज्या पद्धतीनं केवळ आम्हा सर्वाचे धरम करू शकतात. 

तुम्ही स्टार बनलात तर सर्वांना सोबत घेऊन... हात धरून पुढे गेलात, कोणाचाही हात सोडला नाही. ही-मॅन आहात तुम्ही सर्वांचे, पण लहानपणापासूनच तुम्ही माझे हीरो आहात, तुमच्याकडूनच आम्ही स्वप्नं पाहायला शिकलो, तुमच्याकडूनच आम्ही आत्मविश्वास बाळगणं शिकलो, तुमच्या संस्कारांमुळे आम्ही देओल बनलो. 

हृदय असावे तर तुमच्यासारखे, जिद्द असावी तर तुमच्यासारखी, प्रेम करावे तर तुमच्यासारखे, माणूस व्हावं तर तुमच्यासारखे, वडील आहात तुम्ही माझे, पण धरम आहात तुम्ही आम्हा सर्वांचे.

तुमचा असल्याचा अभिमान आहे, हॅपी बर्थडे."

Dharmendra Birthday: मला दुःखी करून...धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी हेमा मालिनींना भावना अनावर; तुम्हालाही रडू कोसळेल

(नक्की वाचा: Dharmendra Birthday: मला दुःखी करून...धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी हेमा मालिनींना भावना अनावर; तुम्हालाही रडू कोसळेल)

बॉबी देओलची इन्स्टाग्राम पोस्ट

Hema Malini Dharmendra Love Story: हेमा मालिनींसाठी काही पण... शुटिंगपूर्वीच उंच टाकीवर चढेल धर्मेंद्र, अन्...

(नक्की वाचा: Hema Malini Dharmendra Love Story: हेमा मालिनींसाठी काही पण... शुटिंगपूर्वीच उंच टाकीवर चढेल धर्मेंद्र, अन्...)

बॉबी देओलची ही पोस्ट वाचून चाहतेही भावुक झाले आहेत. वडिलांच्या निधनाच्या 14 दिवसांनंतर बॉबीने पहिल्यांदाच सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com