जाहिरात

Hair Loss: टक्कल घालवण्यासाठी 'या' मंदिरात जायचं! चिठ्ठी लिहिताच होते इच्छा पूर्ण, कुठे आहे लोकेशन?

Pray to Stop Hair Loss : मिकामी श्राइन हे मंदिर क्योटोमधील प्रसिद्ध अराशियामा भागातील बांबू फॉरेस्टजवळ स्थित आहे. या मंदिराची स्थापना 1960 मध्ये झाली होती.

Hair Loss: टक्कल घालवण्यासाठी 'या' मंदिरात जायचं! चिठ्ठी लिहिताच होते इच्छा पूर्ण, कुठे आहे लोकेशन?

Japnenआजच्या धकाधकीच्या जीवनात आणि वाढत्या प्रदूषणामुळे केस गळती ही एक जागतिक समस्या बनली आहे. या समस्येवर उपचार शोधण्यासाठी लोक महागड्या ट्रिटमेंट्स आणि औषधांचा आधार घेत आहेत. मात्र, जपानमध्ये एक असे मंदिर आहे, जिथे लोक आपली केस गळती थांबावी म्हणून चक्क देवाला साकडं घालतात. क्योटो शहरात असलेल्या या मंदिराचे नाव 'मिकामी श्राइन' (Mikami Shrine) असं आहे.

मंदिराचा इतिहास आणि महत्त्व

मिकामी श्राइन हे मंदिर क्योटोमधील प्रसिद्ध अराशियामा भागातील बांबू फॉरेस्टजवळ स्थित आहे. या मंदिराची स्थापना 1960 मध्ये झाली होती. हे मंदिर फुजीवारा उनेमेनोसुके मसायुकी यांना समर्पित आहे, ज्यांना जपानचे पहिले 'हेअरड्रेसर' मानले जाते.

मसायुकी यांच्या कार्याचा आदर म्हणून जपानमधील न्हावी आणि हेअर स्टायलिस्ट आजही दर महिन्याच्या 17 तारखेला आपली दुकाने बंद ठेवतात. यामुळेच आजही मोठ्या संख्येने बार्बर, हेअर स्टायलिस्ट आणि ब्युटिशियन या मंदिरात व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात.

(नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)

असा पार पडतो 'कम्पात्सु' विधी

प्रसिद्ध ट्रॅव्हलर आणि कंटेंट क्रिएटर शर्विन अब्दोलहामिदी याने या मंदिराला भेट दिल्यानंतर तिथला अनुभव शेअर केला. तेव्हापासून हे मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या मंदिरात केसांच्या आरोग्यासाठी 'कम्पात्सु' (Kampatsu) नावाचा एक विशेष विधी केला जातो.

भाविकांना सुरुवातीला एक लिफाफा खरेदी करावा लागतो, ज्यावर त्यांना आपले नाव आणि जन्मतारीख लिहावी लागते. यानंतर मंदिराचे शिंतो पुजारी भाविकांच्या केसांची एक छोटी लट कापतात आणि ती त्या लिफाफ्यात ठेवतात. पुजारी हा लिफाफा घेऊन भाविकाच्या केसांच्या आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी विशेष प्रार्थना करतात.

(नक्की वाचा-  Shirdi Sai Baba: साईचरणी भक्तानं वाहिला सोन्याचा मुकूट; वजन आणि किंमत किती? वाचा सविस्तर)

शर्विनचा अनुभव आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

स्वतः केस गळतीच्या समस्येशी झुंज देणाऱ्या शर्विनने सांगितले की, "मला माहित नाही की यामुळे काही चमत्कार होईल की नाही, पण या प्रक्रियेने मला एक नवी उमेद दिली आहे." त्याने गंमतीने असेही म्हटले की, जर हे काम केले तर तो शिंतो धर्म स्वीकारण्याचा विचार करेल.

शर्विनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी पुरुषांसाठी 'हेअर लॉस' हा सर्वात वेदनादायक अनुभव असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी या मंदिराला एकदा तरी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com