जाहिरात

Operation Sindoor Film: 'ऑपरेशन सिंदूर' चित्रपटाची घोषणा! पहिलं पोस्टरही समोर; नेटकरी म्हणाले, 'लाजा वाटू द्या..',

Operation Sindoor Movie Film Producer: ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट येणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे ज्यावरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Operation Sindoor Film: 'ऑपरेशन सिंदूर' चित्रपटाची घोषणा! पहिलं पोस्टरही समोर; नेटकरी म्हणाले, 'लाजा वाटू द्या..',

 Operation Sindoor Movie Poster: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत असून सीमेवर हल्ले- प्रतिहल्ले सुरु आहेत. भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहे. एकीकडे सिमेवर हा संघर्ष सुरु असतानाच आता ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट येणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे ज्यावरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यानंतर दिग्दर्शकांनी तात्काळ जाहीर माफी मागितली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निक्की विकी भगनानी फिल्म्सने द कंटेंट इंजिनिअरच्या सहकार्याने ऑपरेशन सिंदूर नावाच्या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच एक पोस्टरही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक महिला सैनिक पाठमोरी उभी असल्याचे दिसत आहे. तिने सैन्याची वर्दी घातली असून हातात रायफल असलेला दाखवले आहे. त्यासोबत ती केसांमध्ये सिंदूर लावताना दिसत आहे. चित्रपटामधील कलाकार, प्रदर्शनाची तारीख किंवा इतर कोणतीही अपडेट्स देण्यात आली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम माहेश्वरी करणार आहेत. मात्र हा पोस्टर समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे ज्यानंतर दिग्दर्शकांना माफी मागावी लागली. 

दिग्दर्शकाने मागितली माफी

 'देशाच्या सैनिकांच्या शौर्याने प्रेरित होऊन त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा भडकवण्याचा आमचा हेतू नव्हता. एक चित्रपट निर्माता म्हणून मी आपल्या सैनिकांचे आणि नेतृत्वाचे धाडस, त्याग आणि ताकद पाहून खूप प्रभावित झालो. मला ही शक्तिशाली कथा प्रकाशात आणायची होती. हा प्रकल्प आपल्या राष्ट्राबद्दलच्या खोल आदर आणि प्रेमातून जन्माला आला आहे, प्रसिद्धी किंवा पैसा मिळविण्यासाठी नाही. तथापि, परिस्थिती आणि संवेदनशीलतेमुळे काही लोकांना अस्वस्थ किंवा नाराज वाटू शकते हे मला समजते. यासाठी मी मनापासून दिलगीर आहे,' असे उत्तम माहेश्वरी म्हणाले. 

त्याचबरोबर त्यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचेही कौतुक केले. "हा फक्त एक चित्रपट नाही, तर संपूर्ण देशाची भावना आणि जगासमोर देशाची सामाजिक प्रतिमा आहे. देशासाठी दिवसरात्र काम करून आपल्याला अभिमान वाटणाऱ्या आपल्या सैन्याचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार. आपले प्रेम आणि प्रार्थना नेहमीच शहीदांच्या कुटुंबांसोबत तसेच सीमेवर दिवसरात्र लढणाऱ्या शूर योद्ध्यांसह राहतील जे आपल्याला एक नवीन पहाट देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असं ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातमी - Ratnagiri news: पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला चोप, रत्नागिरीतली घटना

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com