जाहिरात

Youtuber Arrest: रील्समध्ये काम, बलात्कार, ब्लॅकमेल... 43 लाख सबस्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबर बाप-बेट्याचा अटक

Youtuber Arrested: पीडित मुलगी त्यांच्यासोबत शुटिंगसाठी विविध ठिकाणी जात असे. याच दरम्यान बाप-लेकांनी कपडे बदलत असताना तिचे लपून व्हिडिओ आणि फोटो काढले.

Youtuber Arrest: रील्समध्ये काम, बलात्कार, ब्लॅकमेल... 43 लाख सबस्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबर बाप-बेट्याचा अटक

Popular YouTuber Arrested : प्रसिद्ध युट्युबर आणि त्याच्या मुलाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रील्समध्ये काम देण्याचा बहाना देत आरोपींनी मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अरबिंदू मंडल असे या 48 वर्षीय यूट्यूबरचे नाव असून, त्यांनी कॉमेडी आणि डान्स रील्समध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले.

पीडितेचे वडील हे कोलकाता पोलीसमध्ये कार्यरत आहेत. बासिरहाट उपविभागीय न्यायालयाने आरोपी अरबिंदू मंडलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याच्या मुलाला बाल गुन्हेगार सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबिंदू मंडल आणि त्याच्या मुलाने काही महिन्यांपूर्वी नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीशी संपर्क साधला आणि तिच्यासोबत शॉर्ट्स व्हिडिओ बनवण्याची ऑफर दिली होती.

(नक्की वाचा-  Crime News: पाण्यात काळा कागद टाकताच बनायची 500 ची नोट, ATS ला माहिती मिळताच लावला ट्रॅप)

पीडित मुलगी त्यांच्यासोबत शुटिंगसाठी विविध ठिकाणी जात असे. याच दरम्यान बाप-लेकांनी कपडे बदलत असताना तिचे लपून व्हिडिओ आणि फोटो काढले. 'या फुटेजचा वापर करून दोघांनी तिचे वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला गप्प बसण्यासाठी ब्लॅकमेल केले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अत्याचारादरम्यान अरबिंदूच्या मुलाने पीडितेच्या भांगात कुंकू लावून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

पीडितेच्या कुटुंबाला अरबिंदूची ओळख होती आणि त्यांच्यावर विश्वास असल्याने, आपल्या मुलीवर काय संकट कोसळत आहे याची कल्पनाही त्यांना नव्हती. अखेरीस, मुलीने स्वतः तिच्या कुटुंबाला सर्वकाही सांगितले, तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. पीडितेच्या कुटुंबियांनी तातडीने हारोआ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी रविवारी पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवून पीडितेचा जबाब नोंदवला आणि आरोपींना अटक केली.

(नक्की वाचा- Pune Crime: लॉजवर प्रेयसीचे बर्थडे सेलिब्रेशन, नंतर त्याच चाकूने गळा कापला, पुण्यात रक्तरंजित थरार!)

पोलिसांनी अरबिंदू मंडलकडून त्याचे फोन, कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. अरबिंदूचे दोन यूट्युब चॅनेल्स आहेत. एकावर तो स्किट आणि व्हिडिओ बनवतो, तर दुसऱ्यावर हिंदी आणि बंगाली गाण्यांवर डान्स करतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com