जाहिरात

प्रियांका चोप्रा-आदिनाथ कोठारेचा नवा सिनेमा, 'पाणी' या दिवशी होणार रिलीज

Priyanka Chopra Jonas  Paani Movie: प्रियांका चोप्राचा नवाकोरा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमामध्ये प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

प्रियांका चोप्रा-आदिनाथ कोठारेचा नवा सिनेमा, 'पाणी' या दिवशी होणार रिलीज

Priyanka Chopra Jonas  Paani Movie: प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) आणखी एक नवाकोरा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका चोप्रा निर्मित आणि आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 18 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शनामध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने राजश्री एंटरटेन्मेंट बॅनर (Rajshri Entertainment), पर्पल पेबल पिक्चर्स (Purple Pebble Pictures) आणि महाराष्ट्राची शान असलेले कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड (Kothare Vision Pvt Ltd) तिन्ही मोठे निर्माते एकत्र आले आहेत. या त्रिकुटामुळे मराठी सिनेसृष्टीला एका सर्वोत्कृष्ट सिनेमाची कथा अनुभवायला मिळणार आहे.

नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे (Addinath M. Kothare) यांची कथा असणाऱ्या 'पाणी' सिनेमामध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट एकत्र दिसणार आहे. नेहा बडजात्या (Neha Barjatya), प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) आणि डॅा. मधू चोप्रा (Dr. Madhu Chopra) हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा चित्रपटाचे सहयोगी निर्माते (Associate Producer) आहेत.

Chhaava Teaser Out : शिवरायांचा छावा, विकी कौशल साकारणार स्वराज्यरक्षक संभाजीराजेंची भूमिका

(नक्की वाचा: Chhaava Teaser Out : शिवरायांचा छावा, विकी कौशल साकारणार स्वराज्यरक्षक संभाजीराजेंची भूमिका)

सिनेमाची कथा प्रेरणादायी - प्रियंका चोप्रा 

प्रियांका चोप्राने या सिनेमाबाबत म्हटले आहे की, "पाणी हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांसाठी मोठ्या प्रमाणात आनंद घेऊन येणार आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा हाताळण्यात आला आहे. हा चित्रपट खूप खास आहे. निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहत आहोत, त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे. हा प्रवास अशा एका माणसाचा आहे, ज्याने आपल्या आजूबाजूच्या सर्वांच्याच जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवलाय. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे". 

पुढे ती असेही म्हणाली की, "पर्पल पेबल पिक्चर्स नेहमीच अनोख्या, अविश्वसनीय आणि भारतातील प्रत्येक प्रदेशातील स्थानिक कथांना प्रोत्साहन देते. ‘पाणी' हे मनोरंजन आणि प्रेरणादायी चित्रपटाचे ज्वलंत उदाहरण आहे. आदिनाथचे (Adinath Kothare) दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय आहे. या संपूर्ण टीमचे, त्यांच्या मेहनतीचे मनापासून आभार. माझा चौथा मराठी सिनेमा मी राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या दोन मोठ्या संस्थांसोबत घेऊन येत आहे. याचा मला आनंद आहे."

'मी जिवंत आहे, प्लीज हे थांबवा...' मृत्यूच्या अफवांमुळे श्रेयस तळपदेचा संताप अनावर

(नक्की वाचा: 'मी जिवंत आहे, प्लीज हे थांबवा...' मृत्यूच्या अफवांमुळे श्रेयस तळपदेचा संताप अनावर)

सिनेमामध्ये तगडी स्टारकास्ट 

राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या यांनी म्हटलंय की, "राजश्री एंटरटेन्मेटचा हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि 'पाणी'सारखा सिनेमा घेऊन तगड्या टीमसह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याचा खूप आनंद आहे. हा चित्रपट पाणीटंचाईच्या महत्त्वाच्या समस्येवर भाष्य करणारा असून प्रतिभावान टीमसह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत. पाणीसारख्या सामाजिक मुद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात हा चित्रपट महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा आम्हाला विश्वास आहे.''

Sai Tamhankar : सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

(नक्की वाचा: Sai Tamhankar : सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'या' पोस्टमुळे चर्चेला उधाण)

दिग्दर्शनाच्या पदार्पणामध्ये अशी टीम मिळणे म्हणजे माझे भाग्य - आदिनाथ 

दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणाला की,"प्रियांका चोप्रा जोनस, राजश्री एंटरटेन्मेंट यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या सिनेमाला अशी टीम लाभणे, हे मी माझे भाग्य समजतो. 'पाणी' लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे आणि संपूर्ण टीमला विश्वास आहे की हा एक अनुभव असेल जो दीर्घकाळ प्रेक्षकांसोबत राहील." 

आनंदाची बातमी...मुंबई महापालिकेत मेगाभरतीची; अर्ज करायचाय? डिटेल्ससाठी हा व्हिडीओ पाहाच... 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
'मी जिवंत आहे, प्लीज हे थांबवा...' मृत्यूच्या अफवांमुळे श्रेयस तळपदेचा संताप अनावर
प्रियांका चोप्रा-आदिनाथ कोठारेचा नवा सिनेमा, 'पाणी' या दिवशी होणार रिलीज
justice-hema-committee-report-reveals-malayalam-film-industry-is-ruled-by-mafia-exposes-dark-secrets-shocking-details
Next Article
मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवर 'माफिया'चं राज्य, अभिनेत्री लैंगिक शोषणाच्या शिकार! सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा