सुजीत आंबेकर, सातारा
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' दणक्यात सुरुवात केली आहे. चित्रपट गुरुवारी, 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट कमाईचे नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. मात्र दुसरीकडे पुष्पा-2 चित्रपट बंद पाडण्याचा इशारा सातारकरांनी दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान युवा पिढी पुढे जाणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मरक्षक संभाजी महाराज हा चित्रपट महत्त्वाचा आहे. मात्र अचानकपणे कराडसह महाराष्ट्रात हा चित्रपट बंद करत पुष्पा-2 चित्रपट बहुतांश चित्रपटगृहात दाखवला जात आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दक्षिणात्य पुष्पा चित्रपट बंद पाडण्याचा इशारा साताऱ्यातील नागरिकांनी दिला आहे.
(नक्की वाचा - Allu Arjun Charged : अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?)
धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र पुष्पा चित्रपटासाठी छत्रपती संभाजी महाराज चित्रपट सिनेमागृहात बंद करण्याचा निर्णय डिस्ट्रिब्यूटर लॉबीने घेतला आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी व खेदजनक आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्राची जनता या प्रकाराचा निषेध करत आहे.
(नक्की वाचा- Pushpa 2 : रिलीजपूर्वी पुष्पा 2 ने दिला चाहत्यांना धोका, काय आहे कारण; जाणून घ्या)
धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध करावा अशी मागणी आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पिसाळ यांनी केली आहे. यावेळी मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष राधिका पन्हाळे, मराठा महासंघाचे अनिल घराळ शिवसेनेचे राजेंद्र माने आदींची उपस्थिती होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world