
Ranbir Kapoor Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमाच्या निर्मात्यांनी गुरुवारी (3 जुलै) अभिनेता रणबीर कपूर, यश आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणलीय. पौराणिक कथा रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमामध्ये रणबीर कपूर प्रभू श्री राम, साऊथ सुपरस्टार यश रावण तर अभिनेत्री साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत दिसणार आहे. रिलीज करण्यात आलेला व्हिडीओ अॅनिमेटेड आहे. थ्रीडी व्हिडीओच्या माध्यमातून मुख्य कलाकारांची झलक दाखवण्यात आलीय. व्हिडीओमध्ये रंगाचा वापर करून ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याबाबत प्रभावी पद्धतीने माहिती देण्यात आलीय.
(नक्की वाचा: नेसली मी नऊवारी! आलिया भटचा फ्युजन मराठमोळा लुक PHOTOS)
रामायण सिनेमाची पहिली झलक
टीझरमध्ये रणबीर कपूरला भगवान श्रीरामाच्या भूमिकेत पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत. रणबीर या सिनेमासाठी धनुष्यबाण चालवण्याची कला शिकवलाय. दुसरीकडे रावणाच्या भूमिकेतील यशचा लुक देखील प्रचंड प्रभावी दिसतोय. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना रणबीर कपूर आणि साई पल्लवीची नवी जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये राम आणि रावणाच्या लढाईची झलक दिसली. यानंतर प्रभू श्री राम जंगलातील झाडावर चढून धनुष्यबाण चालवतानाही दिसत आहेत.
शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार ही हीरोईन
सिनेमामध्ये लक्ष्मणाच्या भूमिकेत टीव्ही स्टार रवी दुबे तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अरुण गोविल राजा दशरथ, रकुल प्रीत सिंह शूर्पणखा, काजल अग्रवाल 'मंदोदरी' आणि लारा दत्ता 'कैकई'च्या भूमिकेत दिसणार आहेत.
(नक्की वाचा: Raha Kapoor Photos: राहा कपूरचे हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल 'Cutiepie')
दोन भागांमध्ये सिनेमा येणार भेटीला
रामायण सिनेमा दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पहिला भाग दिवाळी 2026 आणि दुसरा भाग 2027मधील दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. जवळपास 835 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये रामायण सिनेमाची निर्मिती करण्यात आलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world