जाहिरात

Saiyaara Box Office:'सैयारा'ची सलग 2 आठवले बॉक्स ऑफीसवर धूम, कमावला इतक्या कोटीचा गल्ला?

या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. हा चित्रपट इतका मोठा हीट ठरले अशी अपेक्षा कुणीही केली नव्हती.

Saiyaara Box Office:'सैयारा'ची सलग 2 आठवले बॉक्स ऑफीसवर धूम, कमावला इतक्या कोटीचा गल्ला?
मुंबई:

यशराज फिल्म आणि मोहित सूरी यांचा 'सैयारा' चित्रपट 9 दिवसांत 220.75 कोटींचा टप्पा पार करून सुपर डुपर हिट ठरला आहे. अहान पांडे (Ahaan Pandey) आणि अनित पड्डा (Aneet Padda) यांच्यासाठी दुसरा विकेंड रेकॉर्डब्रेक ठरला आहे. यशराजचे सीईओ अक्षय विधानी यांनी निर्मित केलेला 'सैयारा' हा चित्रपट कोणत्याही रोमँटिक चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग विकेंड ठरला आहे. ज्यामुळे अहान पांडे आणि अनित पड्डा रातोरात जे-जी स्टार (Gen Z stars) झाले आहेत. शिवाय संपूर्ण देशाचे सध्या त्यांच्यात नावाची चर्चा आहे. 

सामान्यतः जेव्हा चित्रपटगृहांमध्ये पहिल्या आठवड्यानंतर शोजची संख्या कमी होते, तेव्हा 'सैयारा' बॉक्स ऑफिसवर एक अनोखा ट्रेंड दाखवत आहे. पहिल्या आठवड्यात 2225 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तोच'सैयारा' आता 3800 स्क्रीन्सवर चालू आहे. या माध्यमातून आणखी एका ऐतिहासिक रेकॉर्ड करण्यासाठी सैयारा हा सज्ज झाला आहे. पहिल्या दोन आठवड्यात याच चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर धूम राहीली आहे. या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. हा चित्रपट इतका मोठा हीट ठरले अशी अपेक्षा कुणीही केली नव्हती.  

नक्की वाचा - Saiyaara: सैयाराची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! जे अन्य कुणाला जमलं नाही ते अहान पांडेने करून दाखवलं

सैयारा (हिंदी) - पॅन इंडिया - दुसरा आठवडा

  • शुक्रवार - ₹ 18.50 कोटी
  • शनिवार - ₹ 27.00 कोटी
  • एकूण - ₹ 45.50 कोटी
  • एकूण कमाई - ₹ 220.75 कोटी

अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या स्टारडमची तुलना सोशल मीडियावर श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि आदित्य रॉय कपूरच्या (Aditya Roy Kapur) 'आशिकी-2' (Aashiqui-2) चित्रपटाशी केली जात आहे. चित्रपटाच्या मुख्य जोडीने तरुणाईमध्ये एक वेगळीच उर्जा निर्माण केली आहे. या जोडीने तरूणाईला वेडे केले आहे. अहानपूर्वी इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan), जुनैद खान (Junaid Khan), खुशी कपूर (Khushi Kapoor), सुहाना खान (Suhana Khan) यांसारख्या स्टार किड्सनीही पदार्पण केले आहे. पण ते प्रेक्षकांमध्ये अशा प्रकारची क्रेझ निर्माण करू शकले नाहीत. तर अनित असो किंवा अहान, सोशल मीडियावर दोन्ही स्टार्सची खूप चर्चा होत आहे.

नक्की वाचा - Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड

चित्रपटाची कथा कृष कपूर (अहान) आणि गीतकार सिया (अदिती) यांची आहे. ज्यांची भेट म्यूझिकमुळे होते. नंतर पुढे त्यांच्यात प्रेम होते. पण एका अपघातामुळे सर्व काही बदलते. ज्यामुळे सिया तिचे जुने आयुष्य विसरते.'सैयारा'ने केवळ बॉक्स ऑफिसवरच चांगली सुरुवात केली नाही, तर त्याला सोशल मीडिया आणि प्रेक्षकांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांनी चित्रपटाचे संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि अहान-अदितीच्या केमिस्ट्रीचे भरभरून कौतुक केले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com