जाहिरात

Viral News: 'कोणीतरी धरुन मरेपर्यंत मारेल..', प्रसिद्ध गायकाने अथर्व सुदामेला सुनावलं; पाहा VIDEO

Singer Shaan Atharva Sudame Viral Reel: तो बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शान यांच्याकडे मलाही तुमच्याप्रमाणे गाणे शिकायचे आहे, अशी खास अंदाजात विनंती करताना दिसत आहे. 

Viral News: 'कोणीतरी धरुन मरेपर्यंत मारेल..', प्रसिद्ध गायकाने अथर्व सुदामेला सुनावलं; पाहा VIDEO

Atharva Sudame Singer Shan Video: महाराष्ट्राचा लाडका रिलस्टार म्हणून पुण्याचा कंटेट क्रिएटर अथर्व सुदामेचे नाव घेतले जाते. आपल्या मिश्किल विनोदी शैलीत रिल्स बनवत तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज त्याचे चाहते आहेत. आपल्या चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या अथर्वच्या एका नव्या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध गायक शान त्याला थेट धमकी देताना दिसत आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रसिद्ध रिल्सस्टार आणि कंटेट क्रिएयर अथर्व सुदामे नेहमीच नवनव्या विषयांवर व्हिडिओ बनवत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो त्याच्या या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात. सध्या त्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शान यांच्याकडे मलाही तुमच्याप्रमाणे गाणे शिकायचे आहे, अशी खास अंदाजात विनंती करताना दिसत आहे. 

"शान सर मला गाण्यात करियर करायचं आहे, मलाही सुरांचं धनी व्हायचं आहे," असे म्हणत अथर्व शान यांच्याकडे गाणे शिकवण्यासाठी विनंती करतो. यावर शान ही त्याच्याच भाषेत त्याला जोरदार उत्तर येतात. तुला गाणे गाता येईल फक्त मरेपर्यंत रियाज सुरु ठेव, असं सांगतात. शेवटी अथर्व त्यांना सर मला आशीर्वाद द्या सारे सुर कळतील म्हणजे मला कोणी गप रे म्हणणार नाही.

यावर शान त्याला आत्ता तू  इथून लवकर  पसार हो नाहीतर तुला कोणीतरी धरेल आणि मरेपर्यंत मारेल.. असा इशारा देतात.. दोघांच्या या संगीत भाषेतील जुगलबंदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. दरम्यान,  शान म्हणजेच शंतनू मुखर्जी हे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक आहेत. हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, तेलुगु, कन्नड, नेपाळी, उडिया, पंजाबी आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. ते सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. 

ट्रेंडिंग बातमी - Shivsena Rada: शिंदेंच्या उपशहर प्रमुखाला महिलेने कानफटवले, शिंदेंच्या सेनेत चाललंय काय?