![Entertainment News: 'स्टँडअप कॉमेडी करणे कठीण' सारंग-पॉलाचं ठरलं, पुढचा प्लॅनही सांगितला Entertainment News: 'स्टँडअप कॉमेडी करणे कठीण' सारंग-पॉलाचं ठरलं, पुढचा प्लॅनही सांगितला](https://c.ndtvimg.com/2025-02/9j6vtuv_sarang-sathe-_625x300_08_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
संजय तिवारी
स्टँड अप कॉमेडी म्हटली की उपस्थितांच्या चेहऱ्यावर हमखास हसू येतं. पण,आज स्टँड अप कॉमेडी करणे खरेच किती कठीण होऊन बसले आहे? नुकताच प्रणित मोरेवर झालेला हल्ला याचे उदाहरण आहे. याच विषयावर भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भाडिपाचे सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांनी आता नवा संकल्प केला आहे. याबाबत त्यांनी NDTV मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत आपला पुढचा प्लॅन काय आहे हे सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्टँडअप कॉमेडी करणे कठीण झाले आहे. असं सारंग साठेनं सांगितलं. आजकाल लोकांना रडू पटकन येतं. पण हसायला येत नाही. आपण लवकर भावनिक होतो. आधी आपल्याला कळायचं नाही जगात काय चाललं आहे. पूर्वी पुण्यात सर्वांना वामकुक्षी घ्यायची सवय होती. पण आता मोबाईल फोनवर सर्व जण गुंतलेले असतात. मोबाईलमुळे जगात काय घडत आहे हे आपल्याला कळतं. सोशल माडियीच्या माध्यमातूनही सतत काही ना काही समोर येत असतं. त्यातून काही जण राग आणि द्वेष ही पसरवत असतात. काहींना काही गोष्टी पटत नाही. त्यातूनच स्टँडअप कॉमेडी करणाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रणित मोरे या स्टँडअप कॉमेडीयनवर नुकताच हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर सारंग बोलत होता.
पॉला ही अशा पद्धतीच्या हिंसेचा निषेध करते. ती म्हणाली की स्टँडअप कॉमेडी जर तुम्हाला आवडली नाही तर त्याचा निषेध तुम्ही शब्दात करा. तुम्हाला त्यातलं काही आवडलं नाही तर बोलूनच विरोध करा. पण हिसंचा रस्ता पकडू नका असंही तिने सांगितलं. पुण्यात रहायाला आवडतं. ड्रायव्हींग करायला ही आवडतं. पण पुण्याच्या ट्राफीक बद्दल तीने नाराजी व्यक्त केली. त्यावेळी तिच्या गाडीचं स्ट्रेअरिंग सारंगच्या हातात असतं असं सारंगच सांगतो.
ट्रेंडिंग बातमी - Crime news: बाप की हैवान! 14 वर्षाच्या लेकीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्...
मराठी मनोरंजन दुनियेत अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. सध्या काही प्रोजेक्ट हातात आहेत. त्यावर काम सुरु आहे असंही सारंग यावेळी म्हणाला. या वर्षी भाडीपा सिनेमा बनवणार असल्याचं ही त्याने जाहीर केलं. पुणे मुंबई बाहेरचा हा सिनेमा असेल असंही त्याने स्पष्ट केलं. मुंबई पुणे सोडून बाहेरच्या विषयावर हा सिनेमा बनवला जाईल असं ही त्याने सांगितलं. त्यासाठी दोन तीन विषय आहे. ज्याला पैसे मिळतील त्यावर चित्रपट करू. पण यावर्षी चित्रीकरणाला सुरुवात झालेली असेल असंही त्याने सांगितले.
आनंदवनमध्ये सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन आले होते. त्यांनी आनंदवनला भेट देत इथं कशा पद्धतीने काम केलं जातं हे पाहीलं. बाबा आमटे हे एकाद्या चित्रपटातून समजणार नाहीत. त्यासाठी त्या जागी जावून त्या गोष्टी पाहाव्या लागतील असं आपल्या आईनं सांगितलं होतं असं सारंग साठे याने सांगितले. त्यामुळे आपण आनंदवनात आलो असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी एनडीटीव्हीला खास मुलाखत ही दिली. त्याच वेळी त्यांनी आपला पुढचा प्लॅन काय आहे तो ही स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world