
बॉलिवूडमध्ये MeToo चळवळीची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने एक धक्कादायक आणि भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसत असून, तिला तिच्याच घरात त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावेळी तनुश्री दत्ताने अभिनेते नाना आणि 'चुलमन भाई'चं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.
तनुश्रीने मदतीचं आवाहन करताच एका युजरने तिला कशा प्रकारे मदत करू अशी विचारणा केली. त्यावर तिने लिहिलं की, नाना पाटेकर २०१९ मध्ये त्यांचे जुने मित्र चुलमन भाईकडे गेले. तिथे बोलले की भाई ही तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या एनजीओ आणि एनजीओत होणारे प्रकार उघड करेल. त्यावेळी चुलमन भाईने हे सगळं निस्तरण्यासाठी ५ कोटी घेतले आणि प्लान केला. तनुश्रीने नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला आणि तिचा अंगुलीनिर्देश कुणाकडे आहे, चुलमन भाई कोण? अशा चर्चा आता रुंगू लागल्या आहेत.
(नक्की वाचा- Saiyaara: सैयाराची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! जे अन्य कुणाला जमलं नाही ते अहान पांडेने करून दाखवलं)

Tanushree Dutta
तनुश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओत काय?
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तनुश्री अत्यंत व्यथित दिसत आहे. ती म्हणते, "मला माझ्याच घरात त्रास दिला जात आहे. मला माझ्याच घरात छळले जात आहे. मी नुकताच पोलिसांना फोन केला आहे. त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगितले. मी कदाचित उद्या किंवा परवा तिथे जाईन. माझी तब्येत ठीक नाहीये. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मला खूप त्रास दिला जात आहे."
व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये तनुश्रीने लिहिले आहे, "मी या त्रासाला कंटाळले आहे!! हे २०१८ पासून #metoo पासून सुरू आहे. आज कंटाळून मी पोलिसांना बोलावले आहे. कृपया कोणीतरी मला मदत करा." तिच्या या भावनिक आवाहनानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत.
(नक्की वाचा- Saiyaara Movie Review: 'सैयारा' बॉक्स ऑफिसवर सुसाट! 'या' 5 कारणांमुळे लावलंय प्रेक्षकांना वेड; चित्रपट का पाहावा?)
तनुश्रीने सांगितले, "माझी तब्येत बिघडली आहे. मी काहीही काम करू शकत नाहीये. मी मोलकरीणही ठेवू शकत नाही. मोलकरणींसोबतचा माझा अनुभव खूप वाईट राहिला आहे. त्या येऊन माझ्या घरातून सामान चोरून नेतात. मला स्वतःच माझे सर्व काम करावे लागते. मला माझ्याच घरात त्रास दिला जात आहे. कृपया कोणीतरी मला मदत करा."
"२०२० पासून जवळजवळ दररोज, विचित्र वेळी, मला माझ्या छतावर आणि माझ्या दाराबाहेर असेच मोठे आवाज आणि इतर खूप मोठा आवाज ऐकू येत आहे! मी बिल्डिंग मॅनेजमेंटकडे तक्रार करून थकले आणि काही वर्षांपूर्वी मी हे सर्व सोडून दिले", असंही तनुश्रीने म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world