जाहिरात

Actor Vijay Net Worth: निवडणुकीच्या मैदानात 'थलपथी'चा डंका! संपत्तीचा आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले

Thalapathy Vijay Net Worth 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सुपरस्टार आणि 'तमिलगा वेत्री कझगम' (TVK) पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात विजय यांनी 603 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता जाहीर केली

Actor Vijay Net Worth: निवडणुकीच्या मैदानात 'थलपथी'चा डंका! संपत्तीचा आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले
Actor Vijay

Actor Vijay Net Worth: तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे अभिनेता विजय. आपला नवा राजकीय पक्ष 'तमिलगा वेत्री कझगम' (TVK) च्या माध्यमातून विजय यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. सोमवारी चेन्नई येथे उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपली अधिकृत संपत्ती जाहीर केली असून, त्याचे आकडे पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.

दोन जागांवरून निवडणूक 

अभिनेता विजय तामिळनाडूतील पेरम्बूर आणि तिरुचि ईस्ट या दोन विधानसभा मतदारसंघांतून नशीब आजमावत आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, विजय यांची एकूण मालमत्ता 603.20 कोटी रुपये आहे. यामध्ये चल संपत्ती 404.58 कोटी रुपये (यात 213 कोटींच्या बँक ठेवींचा समावेश आहे). तर अचल संपत्ती 198.62 कोटी रुपये आहे, यात चेन्नईतील मालमत्ता आणि कोडाईकनाल येथील जमिनीचा समावेश आहे. विजय यांच्या वार्षिक उत्पन्न आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 184.53 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. 

Latest and Breaking News on NDTV

लक्झरी कार्स आणि कौटुंबिक कर्ज

विजय यांच्याकडे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अनेक गाड्यांचा देखील ताफा आहे. यात BMW 530, Toyota Lexus, Toyota Vellfire आणि BMW i7 यांसारख्या महागड्या गाड्यांचे ते मालक आहेत. दागिन्यांमध्ये त्यांच्याकडे 883 ग्रॅम सोने आणि चांदी असून त्याची किंमत 15 लाख रुपये आहे.

विजय यांनी आपल्या कुटुंबाला आणि जवळच्या व्यक्तींना कर्जही दिले आहे. यात वडील एस. ए. चंद्रशेखर यांना 3.02 कोटी, आई शोभा शेखर यांना 8.71 लाख आणि पत्नी संगीता यांना 12.60 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

गुन्हेगारी रेकॉर्ड आणि शिक्षण

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विजय यांच्यावर कोणताही गुन्हेगारी खटला प्रलंबित नाही. शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्यांनी 1992 मध्ये चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून बीएससी (BSc) चे शिक्षण अर्ध्यावर सोडले होते. 

Latest and Breaking News on NDTV

ड्रायव्हरच्या मुलाला उमेदवारी

निवडणूक प्रचारादरम्यान विजय यांचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका जाहीर सभेत विजय यांनी आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले. हे पाहून तो तरुण मंचावरच रडू लागला, तेव्हा विजय यांनी त्याला जवळ घेऊन शांत केले. या कृतीमुळे विजय यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com