जाहिरात

Bigg Boss 18: सलमान, गोविंदा, आमीर, SRKच्या हिरोईनची होणार एण्ट्री? नाव आलं समोर

सलमान,गोविंदा,आमिर,शाहरुख यांच्या बरोबर काम केलेली एक अभिनेत्री या शोचा हिस्सा होणार आहे. या बड्या अभिनेत्रीच्या शो मधील एन्ट्रीमुळे या शो ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.

Bigg Boss 18: सलमान, गोविंदा, आमीर, SRKच्या हिरोईनची होणार एण्ट्री? नाव आलं समोर
मुंबई:

बिग बॉस 18 ची वाट प्रेक्षक मोठ्या आतूरतेने पाहात आहेत. या शो मध्ये कोण कोण असणार याची चर्चा सध्या सुरू आहे. यात वेगवेगळ्या बड्या सेलिब्रेटीची नावे चर्चीली जात आहे. मात्र यावेळचा बिग बॉस 18 खास ठरणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. या शोमध्ये बडे स्टार दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही सलमान,गोविंदा,आमिर,शाहरुख यांच्या बरोबर काम केलेली एक अभिनेत्री या शोचा हिस्सा होणार आहे. या बड्या अभिनेत्रीच्या शो मधील एन्ट्रीमुळे या शो ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. हा शो सलमान खान होस्ट करणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

बिग बॉस 18 मध्ये  बहुचर्चीत टीव्ही स्टार असणार आहेत. त्यांच्या बरोबरीला बॉलिवूड स्टारचीही एन्टीर असणार आहे. त्यातील एक नाव समोर आले आहे. ते नाव आहे उर्मिला मातोंडकर यांचे. उर्मिला मातोंडकर बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये रंगिला गर्ल म्हणून उर्मिला मातोंडकरची ओळख आहे. तिने दिग्गज अभिनेत्यां बरोबर काम केले आहे.  त्यात सलमान खान, गोविंदा, शाहरूख या सारख्या अभिनेत्यांचा समावेश आहे. 

ट्रेंडिंग बातमी - गौतमी पाटीलच्या मनात कोणी केलं घर? थेट उत्तर देत चाहत्यांना केलं...

उर्मिला मातोंडकरने सलमान खान बरोबर जानम समझा करो हा चित्रपट केला आहे. हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. उर्मिला मातोंडकर हिने नुकताच पती मोहसिन अख्तर यांच्या बरोबर घटस्फोट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र घटस्फोटा बाबत ना उर्मिलाने काही स्पष्टीकरण दिले आहे ना पती मोहसिन यांनी काही सांगितले आहे.याबाबत मात्र जोरदार चर्चा नक्की होत आहे. उर्मिला बरोबर शिल्पा शिरोडकर आणि शांतीप्रिया यांचे ही नाव समोर येत आहे. या दोघीही या शोचा हिस्सा असू शकतात. 

ट्रेंडिंग बातमी - Navratri 2024: हजारो फूट उंच टेकडीवरील मांढरदेवी काळुबाईच्या प्राचीन मंदिराचे हे आहे प्रमुख आकर्षण 

या शिवाय अन्य काही सेलिब्रेटी या शोमध्ये दिसणार आहेत. त्यात निया शर्मा, करणवीर मेहरा, शोएब इब्राहिम, धीरज धूपर, शहजादा धामी, नायरा बनर्जी, अविनाश मिश्रा या नावांची चर्चा आहे. बिग बॉस 18, 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या शोचा होस्ट हा सलमान खान असणार आहे. सध्या मराठी बिग बॉसने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे हिंदी बिग बॉसची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Govinda Audio Clip : गोळीबारानंतर गोविंदाची ऑडिओ क्लीप समोर, काय म्हणाला?
Bigg Boss 18: सलमान, गोविंदा, आमीर, SRKच्या हिरोईनची होणार एण्ट्री? नाव आलं समोर
telangana-minister-konda-surekha-apologises-samantha-naga-stands-firm-on-ktr-allegations
Next Article
ब्लॅकमेलिंग, ड्रग्ज आणि डिव्होर्स! समंथावरील खळबळजनक आरोपानंतर मंत्री म्हणाल्या...