
Yere Yere Paisa 3 Trailer : मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती. या दोन दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला चारचांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे. ट्रेलरमध्ये ५ करोड रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतेय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच कोटी रुपयांवर आहे. मात्र या ५ कोटी रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना १८ जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे.
(नक्की वाचा- Emraan Hashmi Wife Photos: 'सिरीयल किसर'ची बायको दिसते फारच सुंदर, हे फोटो पाहिल्यावर कळेल का जडलाय तिच्यावर जीव)
राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे. चित्रपटाचा ट्रेलर धमाल असून याला उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. ‘येरे येरे पैसा' ब्लॅाकबस्टर होता आणि तीनही नक्कीच तसाच ब्लॅाकबस्टर ठरेल, याची खात्री आहे.''
रोहित शेट्टी म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर कमाल आहे. ‘येरे येरे पैसा ३' हा पूर्णपणे बॉलिवूड लेव्हलचा एंटरटेनमेंट पॅकेज आहे. संजय जाधव आणि टीमचं काम जबरदस्त असून या चित्रपटाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.''
(नक्की वाचा- Aishwarya-Abhishek : ऐश्वर्याशी घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेकनं सोडलं मौन! गप्प बसण्याचं सांगितलं कारण)
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, '' चित्रीकरणाच्या सुरुवातीपासून माझी अशी इच्छा होती की, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला रोहित शेट्टी आणि राज ठाकरे यावेत आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली. 'येरे येरे पैसा'ला रोहित शेट्टी आले होते आणि तो सुपरहिट ठरला. त्यामुळे यावेळीही त्यांनी यावे, असे मनात होते. ‘येरे येरे पैसा ३'मध्ये आमची जबाबदारी तिपटीने वाढली होती. तिसरा भाग बनवताना आम्ही हेच लक्षात घेतलं आणि त्यामध्ये हसवणं, विचार करायला लावणं आणि गुंतवून ठेवणं, या सगळ्याच गोष्टी एकत्र गुंफल्या आहेत. मला खात्री आहे, तिसऱ्या भागावरही प्रेक्षक तितकेच प्रेम करतील.''
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world