टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल मैदानात जितका चर्चेत असतो, तितकाच तो मैदानाबाहेरही चर्चेत असतो. त्यामुळे शुभमन गिलचं नाव कोणत्या ना कोणत्या सेलब्रिटीसोबत जोडलं जातं. काही दिवसांपूर्वी शुभमनचं नाव सारा अली खान आणि सारा तेंडुलकरसोबत जोडलं गेलं होतं. या लिस्टमध्ये आणखी एक नाव आता जोडलं गेलं आहे.
सोशल मीडियावर अशा बातम्या येत आहेत की शुभमन गिल आणि टीव्ही अॅक्ट्रेस रिद्धिमा पंडित लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात दोघे लग्न करु शकतात. मात्र रिद्धिमाने या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं तिने म्हटलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की टीव्ही अभिनेत्री आणि शुभमन गिलचं डिसेंबरमध्ये लग्न होऊ शकतं. टेली चक्करच्या या रिपोर्टनुसार, रिद्धिमाने इन्स्टाग्रामवर आपल्या स्टोरीतून सांगितलं की, पत्रकारांचे सतत मला कॉल्स येत होते. सर्वजण मला माझ्या लग्नाबद्दल विचारत होते. माझा लग्नाचा निर्णय झाला तर मी नक्की सर्वांना सांगेन.
रिद्धिमाने Etimes ला सांगितलं की, मी शुभमन गिलला व्यक्तिगत ओळखत देखील नाही. मला अभिनंदनाचे मेसेज येत आहे. या गॉसिपबद्दल मला माहिती आहे. त्यामुळे माझ्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट करण्याचा निर्णय घेतला.
कोण आहे रिद्धिमा पंडित?
रिद्धिमा पंडित बहू हमारी रजनीकांत, कुंडली भाग्य या सीरियल्समध्ये झळकली होती. अनेक रिअॅलिटी शोमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. खतरो कें खिलाडी 9, खतरा खतरा खतरा अशा सीरियल्समध्ये ती दिसली होती. बिग बॉस ओटीटी सीजन 1 मध्ये देखील ती होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world