
Vijay Deverakonda Car Accident : टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारला तेलंगणातील जोगुलांबा गडवाला (Jogulamba Gadwala) जिल्ह्यातील उंडावल्ली (Undavalli) येथे अपघात झाला, मात्र सुदैवाने या घटनेतून अभिनेता पूर्णपणे सुरक्षित बचावला आहे. विजय देवरकोंडा प्रवास करत असलेल्या लक्झरी कारची, अचानक वळण घेणाऱ्या एका बोलेरो कारला धडक बसली.
अपघात नेमका कसा झाला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता विजय देवरकोंडाने रविवारी कुटुंबीयांसोबत पुट्टपर्थी येथील श्री सत्य साई बाबा यांच्या 'प्रशांती निलयम' आश्रमाला भेट दिली. त्यानंतर सोमवारी (6 ऑक्टोबर) दुपारी 3 च्या सुमारास हैदराबादकडे परतत होता. त्यानंतर वाटेत उंडावल्ली परिसरात त्यांच्या पुढे चाललेल्या एका बोलेरो वाहनाने अचानक उजवीकडे वळण घेतले. त्यामुळे विजयच्या कारची Bolero च्या डाव्या बाजूला धडक बसली. या वेळी विजय देवरकोंडासह त्याच्या कारमध्ये आणखी 2 लोक होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कोणालाही दुखापत झालेली नाही. विजय देवरकोंडा लागलीच दुसऱ्या वाहनाने पुढील प्रवासासाठी निघाले आणि त्यांच्या टीमने विमा (insurance) प्रक्रियेसाठी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या अपघातात विजयच्या Lexus कारचे थोडे नुकसान झाले आहे.
( नक्की वाचा : Vijay -Rashmika : विजय देवरकोंडा की रश्मिका मंदाना? टॉलीवूडच्या 'पॉवर कपल'मध्ये कोण आहे श्रीमंत? वाचा... )
विजयचा झाला साखरपुडा
विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा नुकताच 3 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील विजयच्या घरी खासगी समारंभात साखरपुडा (engagement) झाल्याचे वृत्त आहे. या समारंभात फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. हे दोघे फेब्रुवारी 2026 मध्ये 'डेस्टिनेशन वेडिंग' (destination wedding) करणार असल्याची चर्चा आहे.
मात्र, विजय किंवा रश्मिका यांनी या साखरपुड्याबद्दल किंवा लग्नाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
विजय देवरकोंडा अलीकडेच 'Gowtam Tinnanuri' यांच्या 'Kingdom' या तेलुगू स्पाय-ड्रामामध्ये दिसला होता. हा सिनेमा जो सध्या नेटफ्लिक्सवर (Netflix) स्ट्रीम होत आहे.
अपघाताचा पाहा Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world