जाहिरात

Vijay -Rashmika : विजय देवरकोंडा की रश्मिका मंदाना? टॉलीवूडच्या 'पॉवर कपल'मध्ये कोण आहे श्रीमंत? वाचा...

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna:  'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या जोडीने खासगी समारंभात साखरपुडा उरकल्याचे वृत्त आहे.

Vijay -Rashmika : विजय देवरकोंडा की रश्मिका मंदाना? टॉलीवूडच्या 'पॉवर कपल'मध्ये कोण आहे श्रीमंत? वाचा...
मुंबई:

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna:  टॉलीवूड चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडीपैकी एक असलेली अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा आहे. 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या जोडीने खासगी समारंभात साखरपुडा उरकल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे फेब्रुवारी 2026 मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सुरू होती, मात्र त्यांनी कधीही सार्वजनिकरित्या याची कबुली दिलेली नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी कुटुंबातील जवळच्या लोकांच्या उपस्थितीतच हा खासगी साखरपुडा सोहळा पार पाडला. 

आता ही जोडी वैयक्तिक आयुष्यातही एकत्र येणार आहे. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. त्यांची संपत्ती किती आहे? विजय आणि रश्मिकामध्ये जास्त कोण श्रीमंत? याची माहिती आम्ही तुम्ही सांगणार आहेत.

( नक्की वाचा : Akshay Kumar Video: अक्षय कुमारच्या मुलीला Nude फोटो मागितले, अभिनेता हादरला, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी )
 

विजय देवरकोंडाची जीवनशैली

विजय देवरकोंडाची जीवनशैली अत्यंत आलिशान आहे. हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात विजयचे 15 कोटी रुपयांचे मोठे घर आहे. तो त्याच्या कुटुंबासोबत तिथे राहतो. हे घर अतिशय आधुनिक आणि पांढऱ्या रंगाचे आहे.

विजयकडे महागड्या गाड्यांचा संग्रह आहे. यात बीएमडब्ल्यू 5 सिरीज ( 65-68 लाख रुपये), फोर्ड मस्टंग ( 75 लाख रुपये), रेंज रोव्हर (64 लाख रुपये) आणि व्हॉल्वो XC90 (85 लाख रुपये) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे एक खासगी विमान (private jet) देखील असल्याची माहिती आहे.

DNA च्या रिपोर्टनुसार, विजयची एकूण संपत्ती 50-70 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तो एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1 कोटी रुपयांहून अधिक आणि इन्स्टाग्रामवरील एका प्रायोजित पोस्टसाठी अंदाजे 40 लाख रुपये घेतो. त्याचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँडही आहे.

रश्मिका मंदान्नाची संपत्ती आणि मालमत्ता

'नॅशनल क्रश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदान्नाची कमाईही मोठी आहे. फोर्ब्सनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती 66 कोटी रुपये आहे.  अल्लू अर्जुनसोबतच्या 'पुष्पा 2: द रुल' साठी तिला 10 कोटी रुपये मानधन मिळाले होते. ती साधारणपणे प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे  4 कोटी रुपये फीस आकारते.

रश्मिकाचं बंगळूरुमध्ये 8 कोटी रुपयांचे भव्य घर आहे. तसेच मुंबई, गोवा, कुर्ग आणि हैदराबादमध्येही तिची मालमत्ता आहे. रश्मिकाकडे ऑडी Q3, रेंज रोव्हर स्पोर्ट, टोयोटा इनोव्हा, ह्युंदाई क्रेटा आणि मर्सिडीज-बेंझ सी-क्लास यांसारख्या कार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com