Virat Kohli Anushka Sharma Video Viral: विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा व्हायरल झालेला नवा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये वामिका आणि अकाय देखील दिसत आहेत. विराट आणि अनुष्काच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये जे काही सुरू असते, ती प्रत्येक गोष्ट चाहत्यांना जाणून घेण्यासाठी इच्छा असते. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून ते अनुष्काच्या भावनिक पोस्टपर्यंत अशा विविध कारणांमुळे दोघं वारंवार चर्चेत आहेत. दोघांचे बरेच व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. नुकतेच विरुष्काने प्रेमानंद महाराजांचीही भेट घेतली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनुष्का आणि विराटचा फॅमिली टाइम व्हिडीओ व्हायरल
यादरम्यान आता सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असल्याचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ प्रचंड क्युट आहे. अनुष्का आणि विराट त्यांचे खासगी जीवनातील महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे टाळतात. पण आता व्हायरल झालेला नवा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
(नक्की वाचा: अनुष्काने विराटचा हात पकडणे टाळलं, अवनीत कौरमुळे नात्यात मिठाचा खडा?)
आजीच्या घरी पोहोचले अकाय आणि वामिका
व्हिडीओमध्ये अनुष्का शर्माने अकायला उचलून घेतले आहे आणि वामिका तिच्या शेजारी उभी दिसत आहे. विराट देखील त्यांच्या आसपासच दिसतोय. तेव्हा अनुष्काची आई घराबाहेर येते आणि मुलीला मिठीत घेते. वामिका देखील आजीला भेटून फार आनंदी झाल्याचे दिसतंय. आजीने अकायला उचलून घेताच वामिका टाळ्या वाजवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय.
(नक्की वाचा: खूश आहेस... प्रेमानंद महाराजांनी विचारल्यानंतर विराट कोहली काय म्हणाला?)
वामिकाने लक्ष वेधून घेतले
आजी आई आणि छोट्या भावाला भेटून आपल्याला कधी मिठी मारेल, याची वाट वामिका पाहत असल्याचे दिसतंय. हा गोंडस क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडलाय. दरम्यान व्हिडीओमध्ये वामिका आणि अकायचा चेहरा दिसत नाहीय. पण भावुक क्षण पाहून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्मितहास्य नक्कीच येईल.