जाहिरात

Virat Kohli: विराटच्या स्वागतासाठी आलेला निळ्या सुटातील 'तो' कोण? तुम्ही ओळखलं का?

विराट कोहली विमानतळावरून बाहेर पडताना हसत-खेळत दिसत होता आणि तो तिवारींसोबत संवाद साधत असताना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. सौरभ तिवारी याच्यासोबत झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव शहबाज नदीम देखील उपस्थित होते.

Virat Kohli: विराटच्या स्वागतासाठी आलेला निळ्या सुटातील 'तो' कोण? तुम्ही ओळखलं का?

Virat Kohli News: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली बुधवारी रांचीमध्ये पोहोचला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिकेसाठी तो रांचीला पोहोचला. बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचं स्वागत करण्यासाठी त्याचा माजी आरसीबी सहकारी आणि झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे (JSCA) सचिव सौरभ तिवारी स्वतः उपस्थित होता.

विराट कोहली विमानतळावरून बाहेर पडताना हसत-खेळत दिसत होता आणि तो तिवारींसोबत संवाद साधत असताना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. सौरभ तिवारी याच्यासोबत झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव शहबाज नदीम देखील उपस्थित होते.

Virat Kohli News

सौरभ-विराटची मैत्री

सौरभ तिवारी आणि विराट कोहली यांची मैत्री 2008 च्या अंडर-19 वर्ल्ड कपपासून आहे. जिथे भारताने कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कपचा खिताब जिंकला होता. नंतर दोघांनी आयपीएलमध्येही एकत्र सामने खेळले. तिवारीला 2011 मध्ये आरसीबीने विकत घेतले होते आणि त्याने 2011 ते 2013 पर्यंत आरसीबीसाठी 40 सामने खेळले. नंतर तो दिल्ली कॅपिटल्स आणि पुणे सुपरजायंट्ससाठी खेळला. 2021 मध्ये मुंबई इंडियन्ससह त्याची आयपीएल कारकीर्द संपली.

सौरभ तिवारी झारखंड क्रिकेट असोसिएशनमध्ये एन्ट्री

गेल्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर, त्याने क्रिकेट प्रशासनात काम करण्यास सुरुवात केली. 34 वर्षांच्या वयात क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सौरभ तिवारीने JSCA प्रशासकीय भूमिका स्वीकारली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूचे स्वागत करण्याची त्याची ही पहिली सार्वजनिक उपस्थिती

वनडे मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. पहिला सामना 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे खेळला जाईल. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे बाहेर आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या देखील या मालिकेत खेळणार नाहीत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com