
Hurun India Rich List 2025 : हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 प्रसिद्ध झाली आहे. या लिस्टनुसार अदाणी उद्योग समुहाचे चेअरमन गौतम अदाणी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली झाली आहे. गौतम अदाणी यांच्या संपत्तीत तब्बल 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदाणी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गौतम अदाणींची संपत्ती 13 टक्क्यांच्या वाढीसह 8.4 लाख कोटींवर पोहोचली आहे.
जगातील श्रीमंतांच्या यादीत टेस्ला, स्पेस एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांचा दबदबा कायम आहे. मस्क यांची संपत्ती तब्बल 82 टक्क्यांची वाढ झाली आहे. इलॉन मस्क यांची संपत्ती या वाढीसह 420 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. इलॉन मस्क चौथ्यांदा हुरुन ग्लोबल बिलिनेअर्सच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.
रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांमध्ये पाचव्या स्थानावर
एचसीएलच्या रोशनी नाडर ज्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 3.5 लाख कोटी रुपये आहे. त्या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला ठरल्या आहेत. जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांचे वडील शिव नाडर यांनी अलिकडेच एचसीएलमधील 47 टक्के भागिदारी त्यांना हस्तांतरित केली होती.
भारतातील श्रीमंतांची यादी
भारतातील श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहे. मात्र त्यांची संपत्ती एक लाख कोटी रुपयांनी घसरून 8.6 लाख कोटींवर आली आहे. दुसऱ्या स्थानावर गौतम अदाणी आहेत. तिसऱ्या स्थानावर एचसीएलच्या रोशनी नाडर असून त्यांची संपत्ती 3.5 लाख कोटी आहे. चौथ्या स्थानावर 2.5 लाख कोटींच्या संपत्तीसह सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी आहे. तर पाचव्या स्थानावर विप्रो समुहाचे अजीम प्रेमजी आहेत. त्यांची संपत्ती 2.2 लाख कोटी रुपये आहे.
- मुकेश अंबानी (रिलायन्स उद्योग समूह) - 8.6 लाख कोटी रुपये
- गौतम अदाणी (अदाणी उद्योग समूह) - 8.4 लाख कोटी रुपये
- रोशनी नाडर (एचसीएल) - 3.5 लाख कोटी रुपये
- दिलीप सांघवी (सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज) - 2.5 लाख कोटी रुपये
- अजीम प्रेमजी (विप्रो) - 2.2 लाख कोटी रुपये
- कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला) - 2 लाख कोटी रुपये
- साइरस एस पूनावाला (सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया) - 2 लाख कोटी रुपये
- नीरज बजाज (बजाज ऑटो) - 1.6 लाख कोटी रुपये
- रवि जयपुरिया (आरजे कॉर्प) - 1.4 लाख कोटी रुपये
- राधाकिशन दमानी (अव्हेन्यू सुपरमार्ट्स) - 1.4 लाख कोटी रुपये
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world