असं म्हणतात की ख्रिसमसला सांता क्लॉज ( Christmas Santa Clause) आपल्याला भेटवस्तू देतो. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबर रोजी अदाणी समूहातील शेअर्सनी (Adani Group Share Price) गुंतवणूकदारांना भरभरून परतावा देत छान गिफ्ट दिलं. शेअर बाजारात (Sensex and Nifty) आज दिवसभर तसं पाहायला गेल्यास सुस्ती दिसत होती, मात्र अदाणी समूहातील समूहाचे शेअर्समध्ये मात्र जबरदस्त उसळी आल्याचे पाहायला मिळत होते. दुपारी 2.30 वाजेपर्यंत अदाणी समूहातील कंपन्यांचे शेअर्स दीड टक्क्यापासून 4 टक्क्यापर्यंत वधारलेले पाहायला मिळाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेअरच्या किंमती वधारण्यासोबतच अदाणी समूहाची मार्केट कॅपही वाढली आहे. एकाच दिवसात अदाणी समूहाची मार्केट कॅप 31 हजार कोटींनी वाढली. अदाणी समूहातील सगळ्या कंपन्यांचे शेअर्स वधारल्याने समूहाची मार्केट गुरुवारी कॅप 13 लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे.
अदाणी पोर्टचा शेअर सर्वाधिक तेजीत
अदाणी समूहातील कंपन्यांमध्ये अदाणी पोर्टच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. अदाणी पोर्टचे शेअर गुरुवारी जवळपास 5 टक्क्यांनी वाढलेले पाहायला मिळाले. अदाणी पोर्टने 6 महिन्यांच्या आतच एक नवी कामगिरी केली आहे. केरळमधील विळिंग्यम बंदरात 100 मालवाहू जहाजे यशस्वीरित्या हाताळण्याचे काम अदाणी पोर्टने केले आहे. मुंद्रा बंदरामध्ये जगातील एकमेव असलेल्या LNG वर चालणाऱ्या CMA CGM फोर्ट डायमेंट दाखल झाले. या जहाजाने टर्मिनल CT4 वर नांगर टाकला आहे.
नक्की वाचा : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी, गुंतवणूकदार झाले मालामाल
गुरुवारी, अदाणी ग्रीनच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त वाढ झाली, तर अदाणी एनर्जीचा शेअर 3.55% नी वधारला होता. याव्यतिरिक्त अदाणी पॉवरचा शेअर 2.78% आणि अंबुजा सिमेंटचा शेअर 1.26% नी वधारला होता. अदाणी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये सुमारे 1% ची वाढ पाहायला आली. गेल्या काही दिवसांपासून अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. बाजारात मंदी असतानाही अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world