
लार्सन अँड टुब्रोचे (Larsen & Toubro (L&T) संचालक एसएन सुब्रमण्यम (SN Subrahmanyan) यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. 'घरी बसून बायकोला किती बघणार? 90 तास काम करा' हे त्यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं. त्याचे सर्वत्र जोरदार पडसाद उमटले. आता त्यानंतर सुब्रमण्यम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी नव्या पिढीतील कर्मचाऱ्यांबाबत मोठी तक्रार केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले सुब्रमण्यम?
चेन्नईत मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात सुब्रमण्यम म्हणाले की, 'भारतीय कामगार ज्यामध्ये तांत्रिक तज्ज्ञांचाही समावेश आहे ते नोकरीमध्ये पुढं येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे उद्योगांमध्ये आव्हान निर्माण होत आहे.
बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कमतरेतेवर बोलताना त्यांनी सांगितलं की जगातील अनेक देश स्थलांतराच्या समस्येचा सामना करत असताना भारतामध्ये लोकं कामासाठी जाण्यास इच्छूक नसल्याची नवी समस्या आहे. कल्याणकारी योजना आणि आर्थिक मदत उपलब्ध असल्यानं कामगारांमध्ये नोकरी करण्याची इच्छा समाप्त होत आहे.
( नक्की वाचा : 70 आणि 90 सोडा आता करा आठवड्यातून 120 तास काम! काय आहे Musk री ?)
सुब्रमण्यमं यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करणाऱ्या जन धन, गरीब कल्याण, मनरेगा सारख्या योजनांना कामगारांच्या कामाबद्दलच्या अनिच्छेसाठी जबादार ठरवलं. या योजनांमुळे त्यांना आर्थिक स्थिरता आली आहे, असं ते म्हणाले.
त्यांनी सांगितलं की, तुम्ही तांत्रिक तज्ज्ञांना कार्यालायात येण्यास सांगितलं ते नोकरीला अलविदा करतात. ही समस्या कामगारांपासून ते इंजिनिअरपर्यंत सर्वत्र पसरली आहे. मी 1983 साली L&T जॉईन केले होते. त्यावेळी माझ्या बॉसनं मला तू चेन्नईचा आहेस दिल्लीत येऊन काम कर असं सांगितलं होतं. पण, आज चेन्नईमधील एखाद्या मुलाला मी दिल्लीत काम कर असं सांगितलं तर तो नोकरी सोडतो.
आयटी क्षेत्रात स्थलांतर करण्याची नापसंती अधिक तीव्र आहे. या क्षेत्रातले कर्मचारी ऑफिसमध्ये येऊन काम करण्याऐवजी दूर ठिकाणाहून काम करण्यास अधिक प्राधान्य देतात.
( नक्की वाचा : Larsen And Toubro: 90 तास काम करा सल्ला देणाऱ्या चेअरमनच्या कंपनीला 70 हजार कोटींचा झटका )
90 तास काम करण्याचा दिला होता सल्ला
सुब्रमण्यम यांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम केले पाहीजे असं मत व्यक्त केलं होतं. 'मला खेद वाटतो की मी तुम्हाला रविवारीही काम करायला लावू शकत नाही, तसे झाले असते तर मला आनंद झाला असता. कारण मी रविवारीही काम करतो,' असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं.
घरी बसून काय करणार आहात ? किती वेळ तु्म्ही बायकोला बघत बसाल आणि बायको तुम्हाला बघत बसेल? असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world