जाहिरात

Budget Day Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी उसळी, पाहा एक तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate High: मागील वर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचा दरात घसरण पाहायला मिळाली होती. सोन्याबाबत अर्थसंकल्पात घोषणा होताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळायली होती.

Budget Day Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी उसळी, पाहा एक तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे अर्थसंकल्प सादर होण्याआधीच  सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या किंमतीने जुने विक्रम मोडीत काढले आहेत. शनिवारी MCX वर सोन्याचे दर 82 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत. 

लग्नसराईच्या काळात नागरिकांना मोठा झटका बसला आहे. देशांर्तग बाजारात सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. 2024 च्या अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील स्टॅम्प ड्युटी हटवली होती. ज्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली होती. 

(नक्की वाचा-  Union Budget 2025 : विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारला मोठी भेट, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा)

Latest and Breaking News on NDTV

अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवारी MCX वर सोन्याचे दर तेजीत पाहायला मिळाले. सोन्याचे दर 82 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी देखील सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. 31 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,090 रुपये होती. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 80,120 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याची किंमत 73060 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 

( नक्की वाचा : Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली; 'पंतप्रधान धनधान्य योजने'ची घोषणा )Latest and Breaking News on NDTV


इंडियन बुलियन ज्येलर्स वेबसाईटनुसार हे सोन्याचे भाव आहेत. संपूर्ण देशात हे दर एकच असतात. मात्र ही किंमत विना मेकिंग चार्जेस आणि विना जीएसटी असते. देशाच्या विविध भागात मेकिंग चार्जेस देखील वेगळे असतात. 1 फेब्रुवारी रोजी सोन्याची किंमत 84 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 

मागील वर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचा दरात घसरण पाहायला मिळाली होती. सोन्याबाबत अर्थसंकल्पात घोषणा होताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळायली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्यावील स्टॅ्म ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्के करण्यात आली होती. या घोषणेनंतर सोन्याच्या दरात 4000 रुपयांपर्यंत घसरण झाली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com