शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. मिश्र जागतिक संकेतानंतर बाजाराची सुरुवात सपाट झाली. दिवसभर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळाली. दिवसअखेर सेन्सेक्स 1,258 अंकांनी आणि निफ्टी 389 अंकांनी घसरला.
सेन्सेक्समध्ये 1.59 टक्क्यांच्या घसरणीची नोंद होऊन 77,965 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सच्या 2 शेअर्समध्ये खरेदी आणि 28 शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळाली. तर निफ्टी 1.62 टक्क्यांनी घसरून 23,616 वर बंद झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोटक सिक्युरिटीचे हेड ऑफ रिसर्च श्रीकांत चौहान यांनी शेअर बाजाराच्या सद्यस्थितीबाबत विश्लेषण करताना सांगितलं की, एक दीड महिन्याचा काळ महत्त्वाचा आहे, कारण अमेरिका चीनवर किती कर लावतायत यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे. एचएमपीव्हीचा इतका परिणाम फार आहे असं वाटत नाही. चीनवर कर लावले चिनी बाजार घसरतील आणि तिथली गुंतवणूक भारतात परत येईल. 2014-2019 ट्रम्प यांनी चीनवर बरेच कर लावले होते त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणामही झाला होता. यावेळी चीन आता या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तयार आहे.
(नक्की वाचा- Property Law : मुलाच्या संपत्तीवर आई-वडिलांचा अधिकार असतो? काय सांगतो कायदा?)
नवी गुंतवणूक करावी का?
15-20 दिवसांचा कालावधी बघितला तर अजूनही घसरण पाहायला मिळेल. 5-8 टक्के करेक्शन बघायला मिळू शकतं. 23500 च्याजवळ आलेलो आहोत. अजून मार्केट खाली गेलं तर खरेदीची संधी आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक मोडू नये, उलट करेक्शन आलं तर गुंतवणूक करावी, असं श्रीकांत चौहान यांनी सांगितलं.
गेल्या वर्षात FIIने 3 लाख कोटींचा माल विकलाय, त्यासमोर देशांतर्गत गुंतवणूक ही 5 लाख कोटींच्या आसपास आहे. हा ट्रेंड कधीच बघायला मिळाला नव्हता. 23200 चा स्टॉप लॉस ठेवा त्याखाली 500-1000 करेक्शन पाहायला मिळू शकतं, असा अंदाज श्रीकांत चौहान यांचा आहे.
पुढे काय होणार हे कळत नसल्याने थोडीशी अस्वस्थता आहे. ट्रम्प सत्तेवर आल्यावर काय होईल, बजेटमध्ये काय होणार ? असे प्रश्न पडू लागल्याने ही अस्वस्थता येते. अशावेळी बाजारातील गुंतवणूक ही सुरक्षित मार्ग शोधत असते. अशा स्थितीत फार्मा सेक्टर हे उत्तम आहे. या सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. सन फार्मा, सिप्लामध्ये गुंतवणूक करावी असा आमचा सल्ला आहे.
( नक्की वाचा : Income Tax : करदात्यांना आनंदाची बातमी! 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना मिळणार सरकारकडून दिलासा )
श्रीकांत चौहान यांनी पुढे सांगितलं की, इन्शुरन्सचे स्टॉक्स आकर्षक आहेत. जीएसटी कमी करण्याचा जो विचार सुरू आहे तो अंमलात आणला तर खूप मोठा ग्रीन सिग्नल आहे इन्शुरन्स कंपन्यांसाठी. या क्षेत्रात सुधारणेचे प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे येत्या 12-18 महिन्यांचा दृष्टीकोण ठेवल्यास गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
बँक सेक्टरवर फोकस
बँक सेक्टरवर फोकस करणं गरजेचं आहे, त्यांचे शेअर हे चांगल्या दरात मिळतायत. भारत 8-9 ट्रिलियनचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत आहे, अशा वेळी बँकांशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि बँकांचे शेअर चांगल्या दरात उपलब्ध आहे. 12-18 महिन्यात बँकांचे शेअर चांगल्या परफॉर्म करतील. HDFC बँक ICIC बँक प्रेफर्ड पिक आहेत. एसबीआय, बँक ऑफ बडोदा या दोनवर लक्ष ठेवू शकतो, असा सल्ला देखील श्रीकांत चौहान यांनी दिला.
(नक्की वाचा- इंटरनेटशिवाय करा UPI Payment, फक्त एका कॉलवर होणार पैसे ट्रान्सफर! वाचा संपूर्ण पद्धत)
आयटीमध्ये 2-3 वर्षात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतील. ट्रम्प अमेरिकेकडे अधिक लक्ष देतील असे म्हणतात. तिथल्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आणि ती चांगली चालायला लागली तर त्याचा चांगला परिणाम भारतातील आयटी सेक्टरवर होत असतो. इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रावर फोकस करणे गरजेचे आहे.
करेक्शन येणारं मार्केट, घबराटीची परिस्थिती असते तेव्हाच गुंतवणुकीची संधी असते. अनेक शेअरच्या किंमती 20 -30 टक्के पडले आहेत. तुमच्या सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करा. गुंतवणूक असेल तर होल्ड करा, मार्केट पडलं तर गुंतवणुकीत भर घाला, असाही सल्ला श्रीकांत चौहान यांनी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world