जाहिरात

Nashik News: वडिलांचे अपहरण, किडन्या काढण्याची धमकी; शेअर बाजार व्यवहारातून भयंकर प्रकार

Nashik Crime News: तक्रारदार शेअर ब्रोकर सुरेश चांदवडकर यांना आरोपी चेतन देशमुख याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांची गुंतवणूक दिली होती.

Nashik News: वडिलांचे अपहरण, किडन्या काढण्याची धमकी; शेअर बाजार व्यवहारातून भयंकर प्रकार

राहुल वाघ, नाशिक

नाशिकच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या वादातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडले आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून सुरू झालेला एक वाद खंडणी आणि अपहरणापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नफ्यासह सर्व रक्कम परत करूनही अतिरिक्त 80 लाख रुपयांसाठी एका शेअर ब्रोकरच्या वडिलांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांची महागडी 'थार' कारही पळवून नेण्यात आली.

वादाचे नेमके कारण

तक्रारदार शेअर ब्रोकर सुरेश चांदवडकर यांना आरोपी चेतन देशमुख याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांची गुंतवणूक दिली होती. चांदवडकर यांनी या गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून दिला आणि मुद्दल व नफ्यासह एकूण 1 कोटी 41 लाख 30 हजार रुपये आरोपीला परत केले होते.

(नक्की वाचा-  मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

किडन्या काढण्याची धमकी 

इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही आरोपी चेतन देशमुखचे समाधान झाले नाही. त्याने अतिरिक्त 80 लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने "किडन्या काढून विकून टाकीन" अशी अत्यंत क्रूर आणि दहशत निर्माण करणारी धमकी दिली.

(नक्की वाचा-  VIDEO: बसमधील एका 'रील'ने घेतला जीव! विनयभंगाचा आरोप, सोशल मीडिया ट्रायलला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या)

वडिलांचे अपहरण 

आपली दहशत वाढवण्यासाठी आरोपीने चांदवडकर यांच्या वडिलांचे अपहरण केले. ब्रोकरची मालकीची महिंद्रा थार कारही आरोपीने बळजबरीने हिसकावून नेली. या भीषण प्रकारानंतर सुरेश चांदवडकर यांनी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी चेतन देशमुख विरुद्ध खंडणी, अपहरण, चोरी आणि धमकावल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com