जाहिरात

Sanjay Shirsat: 'काही जणांनी माझ्याविरोधात...', Income Tax नोटीशीवर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Shirsat :शिवसेना आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने (Income Tax) नोटीस पाठवली आहे.

Sanjay Shirsat: 'काही जणांनी माझ्याविरोधात...', Income Tax नोटीशीवर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई:

Sanjay Shirsat :शिवसेना आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने (Income Tax) नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी शिरसाट यांच्यावर हॉटेल आणि प्लॉट खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप केले होते. याच दरम्यान, त्यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे.

काय म्हणाले शिरसाट?

विधानभवनात माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, ''आयकर विभाग किंवा इतर विभाग त्यांचे काम करत आहेत. यात काहीही गैर नाही." आयकर विभागाने त्यांना 2019 आणि 2024 मधील मालमत्तेतील वाढीबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.

 शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांनी त्यांच्याविरोधात आयकर विभागात तक्रार केली होती. विभागाने या तक्रारीची दखल घेऊन त्यांना नोटीस पाठवली आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी 9 तारखेची मुदत दिली होती, परंतु त्यांनी मुदतवाढ मागितली आहे. "यात काहीही गडबड नाही, ते फक्त स्पष्टीकरण मागत आहेत आणि आम्ही त्याला उत्तर देऊ," असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा: IT notice to Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांना Income Tax ची नोटीस; शिरसाटांचा एकूण संपत्ती किती? )

हॉटेल लिलाव प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी


छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या लिलावाच्या निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास त्याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली. संजय शिरसाट यांच्या मुलाची कंपनी तीन बोलीदारांपैकी एक होती, असा आरोप विरोधकांनी केल्यानंतर शिरसाट अडचणीत सापडले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता.

छत्रपती संभाजीनगरमधील व्हीआयटीएस हॉटेल हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या ढांडा कॉर्पोरेशनचे होते. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (वित्तीय संस्थांमधील) अधिनियम, 1999 अंतर्गत व्हीआयटीएस हॉटेलसह ढांडा कॉर्पोरेशनची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. न्यायालयाने हॉटेलच्या लिलावाचे आदेश दिले होते, त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रक्रिया राबवली.

( नक्की वाचा: Devendra Fadnavis: '4 बोटं तुमच्याकडं', शिक्षकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर मोठा आरोप )

दानवे यांनी लिलाव प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. मेसर्स सिद्धांत मटेरियल प्रोक्योरमेंट अँड सप्लायर्स कंपनीसह तीन कंपन्या या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. दानवे यांनी सांगितले की, 'ही कंपनी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलगा सिद्धांत यांची आहे.'

शिरसाट यांच्यावर आतापर्यंत झालेले आरोप

  • संजय शिरसाटांच्या मुलावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले, नंतर तक्रार मागे घेतली.
  • संजय शिरसाटांनी शाजापूरमध्ये 30 कोटींची जमीन 1 कोटीला घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. 
  • छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात महागड्या जालना रोडवर शिरसाटांनी कवडीमोल किंमतीत भूखंड खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केला. 
  • शाजापूरमध्येच शिरसाटांनी दोन भूखंड लाटल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. दोन्ही भूखंड 2 गुंठे 10 एकरच्या आसपास असून एक भूखंड 1 कोटी 50 लाखांमध्ये तर त्याच्याच शेजारचा भूखंड 50 लाखांना खरेदी केल्याचं जलील यांनी सांगितलं. 
  • व्हीट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 110 कोटींचं हॉटेल शिरसाटांनी 67 कोटींना खरेदी केल्याचा आरोप झाला.
  • शेंद्रा MIDC मध्येही शिरसाटांनी भूखंड लाटल्याचा आरोप जलील यांनी केला होता. ट्रक टर्मिनलसाठीची 106 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप होता. त्यासाठी जमिनीच्या आरक्षणात फेरफार केल्याचा दावा जलील यांनी केला.
  • आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट नाशिकमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधत असून,त्यासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन घेतल्याचा आरोप.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com