जाहिरात

India-Pakistan Ceasefire नंतर शेअर बाजारात उसळी, Sensex-Nifty मध्ये जबरदस्त तेजी

Stock Market Today: भारत-पाकिस्तान आणि रशिया-युक्रेन या दोन्ही युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता कमी झाल्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी होण्याची शक्यता आहे.

India-Pakistan Ceasefire नंतर शेअर बाजारात उसळी, Sensex-Nifty मध्ये जबरदस्त तेजी

Share Market Today : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर (India-Pakistan Ceasefire ) शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वेगाने रिकव्हरी झाली. सकाळी 9.22 वाजता, सेन्सेक्स 1889.43 अंकांनी म्हणजे 238 टक्के वाढून 81,343.90 च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टीमध्येही अपट्रेंड पाहायला मिळाला. निफ्टी 568.10 अंकांच्या म्हणजेच 2.37 टक्के वाढीसह 24,576.10 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारत-पाकिस्तान आणि रशिया-युक्रेन या दोन्ही युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता कमी झाल्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. आज मात्र गमावलेले सगळं भरुन निघण्याची चिन्हं आहेत.

अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये वाढ

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. अदाणी ग्रुपचे शेअर जवळपास 6 टक्क्यांनी वधारले. अदाणी एनर्जी, अदाणी पॉवर 6 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर अदाणी एंटरप्राइजेज, अदाणी ग्रीनच्या शेअर्समध्ये 5 टक्के उसळी पाहायला मिळाली आहे. संरक्षण आणि बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांचा कल दिसून येत आहे. 

(नक्की वाचा-  Mobile App : हे 5 सरकारी अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)

बाजारातील उसळीची कारणे   

  1. भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव ओसरला 
  2. रशिया-यूक्रेन यांच्यात 15 मे पासून थेट वाटाघाटी
  3. अमेरिका-चीन व्यापार युद्धात तोडगा निघण्याची शक्यता, चालू आठवड्यातच दोन्ही देशांच्या वाटाघाटी होणार
  4. मान्सून वेळेआधीच केरळमध्ये येण्याची शक्यता 
  5. चौथ्या तिमाहीच्या निकालात बहुतेक कंपन्यांची कामगिरी समाधानकारक

(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

सोन्याच्या दरात घसरण

शेअर बाजारातील तेजीदरम्यान सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. MCX वर सोने वायदा 2.50 टक्क्यांनी घसरून 95,000 रुपयांच्या खाली आला आहे. सोन्याच्या दरात 2400 रुपये प्रति 10 ग्रामहून अधिकच्या घसरणीची नोंद झाली आहे. इंट्राडेमद्ये सोने जून वायदा 94,094 रुपये प्रति 10 ग्रामपर्यंत आला आहे. 

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com