जाहिरात

ITR भरण्याची तारीख वाढणार? कर विभागाने दिली मोठी अपडेट

शेवटच्या क्षणी घाई-गडबड करण्याऐवजी आताच आयटीआर भरावा असं आवाहन कर विभागाकडून केलं जात आहे.

ITR भरण्याची तारीख वाढणार? कर विभागाने दिली मोठी अपडेट

ITR Last date : करदात्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही उत्पन्न कर कक्षेत येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिटर्न भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा कोटींहून अधिक लोकांना आयकर रिटर्न भरलं आहे. या आकड्यांमध्ये वाढ होत आहे.

हेल्पडेस्क सातत्याने करतेय काम

सोशल मीडिया एक्सवर कर विभागाने सांगितलं की, लोक अद्यापही रिटर्न भरत आहेत. मात्र अद्यापही अनेकांनी टॅक्स भरलेला नाही. रिटर्न भरण्यात कोणतीही अडचण आल्यास विभागाचं हेल्पडेस्क 24x7 काम करीत आहेत. अद्यापही तरी डेडलाइन वाढविण्याबाबत विभागाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका

अद्यापही तुम्ही रिटर्न भरला नसेल तर तातडीने भरून घ्या. शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका. विभागाने सांगितलं की, शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी आताच रिटर्न भरा. ज्या सहा कोटी नागरिकांनी वेळेवर रिटर्न भरला त्यांचे विभागाकडून आभार मानण्यात आले आहे. कर विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, हेल्पडेस्क 24x7 काम करीत आहे. कॉल, लाइव्ह चॅट, वेबएक्स सेशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली जात आहे.

अनेक फॉर्ममध्ये बदल केल्याने डेटलाइन वाढवली होती...

देशभरातील करदात्यांना मोठा दिलासा देत आयकर विभागाने या वर्षी आयटीआर दाखल करण्याचा वेळ 31 जुलैमध्ये वाढ करीत 15 सप्टेंबर केली होती. विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, आयटीआरच्या अनेक फॉर्ममध्ये बदल केल्याने डेडलाइन पुढे करण्यात आली होती. विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात आयकर दाखल करण्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी 31 जुलै, 2024 पर्यंत रेकॉर्ड 7.28 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते, तर 2023-24 मध्ये 6.77 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com