जाहिरात

Gold Rate Today: सोन्याच्या दरात 2100 रुपयांची घसरण, चांदीही स्वस्त; चेक करा नवे दर

Gold Silver Rate Today: अमेरिकन आणि इराणमधील युद्धविरामाच्या घोषणेमुळे सोन्याचे दर 2100 रुपयांनी तर चांदीचे दर 7000 रुपयांनी खाली आले आहेत.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात 2100 रुपयांची घसरण, चांदीही स्वस्त; चेक करा नवे दर

Gold Silver Rate Today: जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्या आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा मोठी कोलांटीउडी मारली आहे. काल युद्धाच्या भीतीमुळे गगनाला भिडलेले दर, आज अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धविरामाची (Ceasefire) घोषणा होताच कोसळले आहेत. सोन्याच्या दरात 2100 रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 7000 रुपयांची मोठी घसरण आज नोंदवण्यात आली.

जळगावातील आजचे ताजे दर

  • सोने (24 कॅरेट) - 1,49,500 रुपये/प्रति तोळे (1,53,985 जीएसटीसह)
  • चांदी - 2,40,000 रुपये/प्रति तोळे (2,47,200 जीएसटीसह)

(नक्की वाचा-  US-Iran War : इराणची नवी खेळी! होर्मुजमधून जहाज वाहतूक सुरू होणार, मात्र भारतासह अनेक देशांना फटका बसणार)

घसरणीचे मुख्य कारण 

अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या सीजफायरवर सहमती झाल्याने जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटली.
काल युद्धाच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सोने खरेदीचा धडाका लावला होता, मात्र आज तणाव निवळल्याने नफावसुली सुरू झाली. एका दिवसात मोठी वाढ आणि दुसऱ्या दिवशी मोठी घसरण यामुळे सर्वसामान्य ग्राहक सोने खरेदी करावे की आणखी वाट पाहावी, या संभ्रमात आहेत.

जळगावमधील सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, जागतिक परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. "एका दिवसात सोन्यात 2 हजार आणि चांदीत 7 हजारांची वाढ-घसरण होणे हे अनपेक्षित आहे. यामुळे बाजारात स्थिरता येईपर्यंत खरेदी-विक्रीवर परिणाम होऊ शकतो," असे स्थानिक सराफांनी सांगितले.

(नक्की वाचा-  Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?)

भारतावर परिणाम

भारतात सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरची स्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींनुसार सोन्याचे भाव बदलत आहेत. होर्मुजची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेलाचा पुरवठा सुरळीत होईल, अशी चिन्हे असल्याने सोन्याच्या दरात ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com