दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी 1 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर बाजार 1 तास खुला राहणार आहे. अधिकृतपणे 1 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बँका आणि शेअर बाजारांसाठी सुट्टीचा दिवस आहे. मात्र गुंतवणूकदारांसाठी खरेदी/विक्रीसाठी ट्रेडिंग विंडो तासाभरासाठी उघडली जाणार आहे. या विशेष थेट ट्रेडिंग सत्राला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत असेल.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 1 नोव्हेंबरला शेअर बाजार फक्त एक तासासाठी उघडेल. या दिवशी नियमित ट्रेडिंग होणार नाही. प्री-ओपनिंग सत्राच्या वेळ 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.45 ते 6 अशी असेल.
(नक्की वाचा - पती की पत्नी, कोणाच्या खात्यात येणार पीएम किसान योजनेचे 6 हजार? कधी येणार पैसे?)
BSE आणि NSE च्या वेबसाइटनुसार, इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटीज, बॉण्ड्स आणि ट्रेडिंगला एक तासाची विशेष परवानगी असेल. 1 तासाच्या सत्रात प्री मार्केट आणि पोस्ट-मार्केट सेटलमेंट देखील होतील. म्हणजेच एका तासात बाजार त्याच्या नेहमीच्या ट्रेडिंग दिवसांप्रमाणे उघडेल.
(नक्की वाचा- Health insurance : ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवरील जीएसटीमध्ये सवलत, मंत्रिगटात निर्णय)
'मुहूर्त' ट्रेडिंगसाठीचा वेळ ग्रहांच्या स्थितीनुसार निवडलेला शुभ काळ असतो. दरवर्षी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) हिंदू कॅलेंडरनुसार नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करण्यासाठी दिवाळी दरम्यान विशेष व्यापार सत्र आयोजित करतात. बीएसई आणि एनएसई या संदर्भात स्वतंत्र अधिसूचना जारी करतील.