
Gold Investment : आर्थिक वर्ष 2025 मध्ये सोने ही सर्वात फायदेशीर मालमत्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत सोन्याची किंमत 41 टक्क्यांनी वाढली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब पुढे आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लॉन्ग टर्ममध्ये भारतीय शेअर बाजाराने सोन्यापेक्षा चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे संपत्ती निर्माण करण्याचा शेअर बाजार हा एक चांगला मार्ग असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. जगभरात सोन्याची मागणी गेल्या 15 वर्षांत सर्वाधिक आहे. याचे कारण म्हणजे लोकांनी त्यात मोठी गुंतवणूक केली आणि केंद्रीय बँकांनीही सतत सोने खरेदी केले.
(नक्की वाचा- Akshaya Tritiya 2025: सोन्याच्या दरात मोठी सूट, 'या' ब्रँड्सची मेगा ऑफर)
केंद्रीय बँकांनी त्यांच्या परकीय चलनाच्या साठ्यात विविधता आणण्याचा प्रयत्न करत सलग तिसऱ्या वर्षी 1000 टनांपेक्षा जास्त सोने खरेदी केले. NSE ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतातही हाच ट्रेंड दिसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ही गेल्या तीन आणि पाच वर्षांत सोन्याची तिसरी सर्वात मोठी सरकारी खरेदीदार आहे. आता RBI च्या परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा 11 टक्क्यांहून अधिक झाला आहे.
सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्समुळे बळकटी
सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्सद्वारे (SGB) भारतातील सोन्याची आर्थिक बाजारपेठ अधिक बळकट झाली आहे. हा एक विशेष प्रकारचा सरकारी बाँड आहे जो निश्चित परतावा देतो. याशिवाय हा करमुक्त आहे आणि सुरक्षित देखील आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये लॉन्च झाल्यापासून सुमारे 147 टन सोने किंवा 72,274 कोटी रुपेय SGBs द्वारे जमा केले गेले आहे.
(नक्की वाचा - MHADA Lottery : मुंबईत म्हाडाच्या 5000 घरांसाठी दिवाळीत लॉटरी)
सतत भू-राजकीय जोखीम आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी कायम राहील. केंद्रीय बँका देखील सोने खरेदी करणे सुरू ठेवतील, असं देखील NSE च्या अहवालात म्हटले आहे. मात्र दीर्घ कालावधीत भारतीय शेअर बाजाराने सोन्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 20 वर्षांत, निफ्टी 50 ने 13 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर एकूण परतावा 14.4 टक्के आहे, जो याच कालावधीतील सोन्याच्या परताव्यापेक्षा अधिक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world