Mumbai Climate Week And National Stock Exchange : भारताच्या पहिल्या जागतिक हवामान कृती आणि सोल्युशन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या मुंबई क्लायमेट वीक (MCW) ने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमापूर्वी आज क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजच्या शुभारंभाची घोषणा केलीय.क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजच्या माध्यमातून ग्लोबल साऊथमध्ये मोठ्याप्रमाणात लागू करण्यास योग्य अशा स्टार्टअप्सने नवं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
प्रोजेक्ट मुंबई,महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या भागीदारीतून आयोजित MCW हे जगभरातील हवामान तज्ज्ञ,युवक,स्टार्टअप्स,सामाजिक संस्था,विद्यार्थी उद्योगजक आणि NGO संस्थांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे.हा कार्यक्रम 17–19 फेब्रुवारी 2026 रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर,मुंबई येथे होणार आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
इनोव्हेशन चॅलेंज पार्टनर या उपक्रमाचे नेतृत्व करणार
एनसई (NSE) इनोव्हेशन चॅलेंज पार्टनर म्हणून या उपक्रमाचे नेतृत्व करणार आहे. हवामान बदल शमन,अनुकूलन आणि रेसिलियन्ससाठी आवश्यक स्टार्टअपना प्रकाशझोतात आणणे, या उद्देशाने क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजची रचना करण्यात आली आहे. हा चॅलेंज,स्टार्टअप्स,विद्यार्थी,संशोधक,NGO आणि क्लायमेट उद्योजक यांच्यासाठी खुला असेल.अंतिम सादरीकरण (MCW 2026) मध्ये मंचावर करण्यात येईल.ग्लोबल साउथमधील अनेक देशांना आमंत्रित करण्यात आले असून, ही स्पर्धा भारतातील उपायांना जागतिक पातळीवर स्थान देणारी ठरेल.
नक्की वाचा >> CIDCO News: भारी घरं, जबरदस्त लोकेशन! सिडकोतर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' 4508 घरांची भन्नाट योजना
फेब्रुवारी 2026 मध्ये होणारा मुंबई क्लायमेट वीक हा भारताच्या नेट झिरो 2070( Net Zero 2070)च्या ध्येयप्राप्तीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.या ध्येयासाठी 2070 पर्यंत 10 ट्रिलियन USD पेक्षा अधिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे.स्वच्छ ऊर्जा,हरित वाहतूक आणि सक्षम पायाभूत सुविधा यामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक होणे गरजेचे आहे,असे एनएसई व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी म्हटलं आहे.
CEO शिशिर जोशी काय म्हणाले?
प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी म्हटलंय की,“मुंबई क्लायमेट वीक हे कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत बदलण्यासाठी सक्षम प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. एनएसई सोबतची भागिदारीआमच्या प्रयत्नांना नवी दिशा आणि वेग देत आहे. शहरे आणि समुदाय हवामान बदलाशी सक्षमपणे जुळवून घेऊ शकतील अशा उपायांना पुढे नेणे हे आमचे ध्येय आहे. नवोन्मेषक (Startups), गुंतवणूकदार (Investors), तज्ञ, स्थानिक संस्था आणि धोरणकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणून आम्ही मुंबईसह संपूर्ण प्रदेशासाठी हवामान कृतीचे नवे मार्ग खुलं करत आहोत.”
नक्की वाचा >> NDTV मराठीच्या बातमीचा दणका! 'त्या' शाळेतील मुख्याध्यापकावर मोठी कारवाई, विद्यार्थ्यांसोबत काय घडलं होतं?
MCW हे नागरिक-केंद्रित उपक्रम म्हणून रचले गेले आहेत. हवामान कृती (CLIMATE ACTION), संवाद, आणि विविध क्षेत्रांतील म्हणजेच चित्रपट, पाककला, कला, क्रीडा, आरोग्य यातील हवामानाशी संबंधित चर्चा आणि उपक्रमांना चालना देणार आहे. NSS स्वयंसेवकांच्या मदतीने महाविद्यालयेही मोठ्या प्रमाणावर या प्रक्रियेत सहभागी होतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world