इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ओला इलेक्ट्रिकचा IPO येत्या 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे. गुंतवणूकदार 6 ऑगस्टपर्यंत या आयपीओमध्ये पैसे गुंतवू शकतात. ओला आयपीओ इश्यू साईज आणि प्राईज बँड तसेच कंपनीची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बंगलुरुमधील ओला इलेक्ट्रीक कंपनीने आपला IPO प्राईज बँड निश्चित केला आहे. आयपीओचा प्राईज बँड 72 ते 76 रुपये प्रति शेअर असणार आहे. आयपीओसाठी मिनिमम लॉट साईज ही 195 शेअर असणार आहे. या पटीत पैसे लावले जातील. प्राईज बँडनुसार कंपनीचं बाजार मूल्य 33,522 कोटी आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये फंड जमवण्यासाठी असलेल्या मुल्यापेक्षा हे बाजार मूल्य कमी आहे.
(नक्की वाचा - New Rules 2024: 1 ऑगस्टपासून देशभरात 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम!)
ओला आयपीओ येत्या 2 ऑगस्टपासून सुरु होईल आणि 6 ऑगस्ट रोजी बंद होईल. ऑफरसाठी अँकर बूक 1 ऑगस्टला सुरु होईल. कंपनीची लिस्टिंग 9 ऑगस्ट रोजी होईल.
डिसेंबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने 47,932 कोटी रुपयांच्या मूल्यांकनाने सीरिज ई-फंडिंगमध्ये 1163.20 कोटी रुपये जमवले होते. त्यावेळी कंपनीच्या शेअरची जवळपास 130 रुपये होती. ओला इलेक्ट्रिकच्या IPO च्या किंमतीत मागील फेरीच्या तुलनेत सुमारे 30 टक्के सूट आहे.
( नक्की वाचा : सोनं होणार स्वस्त! संपूर्ण देशभर असणार एकच भाव? काय आहे नवं धोरण? )
IPO मधून उभारलेले पैसे कुठे खर्च होणार?
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, IPO मध्ये 645.6 कोटी रुपये OFS आणि 5500 कोटी रुपयांच्या नवीन शेअरचा समावेश केला जाईल. याशिवाय,
- भांडवली खर्च - 1,227.64 कोटी रुपये
- कर्जाची परतफेड- 800 कोटी रुपये
- संशोधन - 1600 कोटी रुपये
- ऑर्गेनिक डेव्हलपमेंटसाठी - 350 कोटी रुपये