जाहिरात
This Article is From Jul 23, 2024

गरिबांच्या मुलांना कसा होणार बजेटचा फायदा? PM मोदींनी केलं विश्लेषण

PM Modi On Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटचा गरिबांच्या मुलांना कसा फायदा होणार आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजावून सांगितलं आहे.

गरिबांच्या मुलांना कसा होणार बजेटचा फायदा? PM मोदींनी केलं विश्लेषण
PM Modi on Budget : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय बजेटचं स्वागत केलं आहे.
मुंबई:

PM Modi On Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेट 2024 चं स्वागत केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांची टीम प्रशंसेसाठी पात्र आहे, असं त्यांनी सांगितलं. 'हे बजेट समाजातील प्रत्येक वर्गाला बळकटी देणारं आहे. देशातील गावं, शेतकरी, गरीब आणि शेतकऱ्यांना समृद्धी देणारं हे बजेट आहे. गेल्या 10 वर्षात 10 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेखालून बाहेर काढलं आहे. त्यानंतर जो नवा मध्यमवर्ग तयार झालाय त्याला भक्कम करणारं हे बजेट आहे, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. 

पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, 'हे तरुणांना अनेक संधी देणारं बजेट आहे. या बजेटमध्ये शिक्षण आणि स्किलसाठी अनेक स्केल देण्यात आले आहेत. हे मध्यमवर्गाला बळ देणारं बजेट आहे. जनजातीय समाज, दलित, मागास यांना सशक्त करणाऱ्या योजना या बजेटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. या बजेटमुळे महिलांची आर्थिक भागिदारी निश्चित होण्यासाठी मदत होईल.'

( नक्की वाचा : तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल )
 

पंतप्रधान म्हणाले की, 'या बजेटमुळे लहान व्यापारी, MSME यांना प्रगतीचा नवा रस्ता मिळेल. या बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळणार आहे. रोजगार आणि स्वरोजगाराला संधी देणारं हे बजेट आहे.'

या बजेटमध्ये देशात कोट्यवधी नवे रोजगार मिळणार आहेत. आयुष्यात पहिल्यांदा नोकरी देणाऱ्या तरुणांना पहिला पगार आमचं सरकार देईल. स्किल डेव्हलपमेंट आणि उच्च शिक्षणातील मदत तसंच एक कोटी तरुणांना इंटर्नशिप योजनेनुसार गावातील गरिबांची मुलं-मुली आघाडीच्या कंपनीत कामं करतील. त्यांच्या प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील,' असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. 

( नक्की वाचा : किसान क्रेडिट कार्ड ते नैसर्गिक शेती! Budget 2024 मध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं? )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: